मोदी यांना रोखण्यासाठी इस्लामी देशांकडून विरोधकांना पैसे मिळत आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा यांचा आरोप

योगत्रऋषी रामदेवबाबा यांच्या या आरोपाची केंद्रातील भाजप सरकार आणि निवडणूक आयोग यांनी चौकशी केली पाहिजे आणि रामदेवबाबा यांच्याकडे याविषयी जी काही माहिती असेल, ती त्यांनी अन्वेषण यंत्रणांना दिली पाहिजे !

जोधपूर – जगभरातील इस्लामी देश विरोधकांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्‍यांना) पैसा पुरवत आहेत. कोणत्याही प्रकारे त्यांना मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून रोखायचे आहे, असा आरोप योगऋषी रामदेवबाबा यांनी केला आहे. मोदी यांचा असा अपराध तरी काय आहे की, सर्व लोक एकत्र येऊन त्यांना पंतप्रधान होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्‍नही त्यांनी या वेळी विचारला. ते येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असतांना त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वी त्यांनी ‘मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही’, असे म्हटले होते. रामदेवबाबा यांचे शिष्य बाबा बालकनाथ हे अलवर येथून, तर दुसरे शिष्य सुमेधानंद हे सीकर येथून निवडणूक लढवत आहेत.

रामदेवबाबा भाजपसाठी प्रचार करू लागल्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केला की, रामदेवबाबा योगगुरु नाही, तर व्यापारी आहेत. (रामदेवबाबा काँग्रेसच्या विरोधात प्रचारासाठी उतरल्यावर काँग्रेसला असा जळफळाट होणारच ! जर त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला असता, तर काँग्रेसने कधी असा आरोप केला असता का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF