छेड काढणारे काँग्रेसी नेते जमालुद्दीन यांना महिला स्वच्छता कर्मचार्‍याने चोपले

  • आधीच धर्मांध आणि त्यात काँग्रेसचा नेता असल्यावर वेगळे काय घडणार ?
  • हिंदूंच्या संतांवर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप लावणारे काँग्रेसचे नेतेच कोणत्या पात्रतेचे आहेत, हे जनतेने लक्षात घ्यावे !

पांवटा साहिब (हिमाचल प्रदेश) – येथील काँग्रेसचे नेते जमालुद्दीन यांनी येथील सरकारी रुग्णालयामधील शीला नावाच्या महिला स्वच्छता कर्मचार्‍याची छेड काढल्यावर या महिलेने त्यांना चपलेने चोपले. या घटनेची माहिती मिळाल्यावर रुग्णालयातील अन्य कर्मचारी आणि काही डॉक्टर यांनीही जमालुद्दीन यांना चोपले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पीडित कर्मचारी शीला यांनी सांगितले की, मी जेव्हा सफाई करत होते, तेव्हा जमालुदीन तेथे आले. त्यांनी ‘तू नीट स्वच्छता करत नाहीस’, असे म्हणत माझा हात पकडला आणि छेडछाड केली.’


Multi Language |Offline reading | PDF