तुम्हाला कोणापासून ‘आझादी’ हवी आहे ?

बेगुसराय (बिहार) येथे गावकर्‍यांनी भाकपचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांचा रस्ता अडवून त्यांना जाब विचारला

देशविरोधी घोषणा करणार्‍यांना खर्‍या राष्ट्रभक्तांनी असाच जाब विचारणे अपेक्षित आहे ! असे देशभक्त सर्वत्र असतील, तर अशा देशविरोधी लोकांना घराच्या बाहेर पडणेही कठीण होईल !

बेगुसराय (बिहार) – बेगुसराय या मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमदेवार असलेले कन्हैय्या कुमार यांना प्रचाराच्या वेळी एका गावातील नागरिकांनी अडवून त्यांना ‘तुम्हाला कोणापासून आझादी हवी आहे ?’ असा प्रश्‍न विचारल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. या वेळी गावकर्‍यांनी कन्हैय्या कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नवी देहलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात संसदेवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी फाशी देण्यात आलेला आतंकवादी महंमद अफझल याच्या मृत्यूदिनाच्या वेळी तेथील विद्यार्थ्यांनी भारतापासून आझादी हवी असल्याच्या आणि देशाचे तुकडे तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या होत्या. त्यात कन्हैया कुमार हे प्रमुख होेते.

ग्रामस्थांनी कन्हैया कुमार यांना, ‘गरीबांना कोणतीही आझादी नको आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासवर्गियांना १० टक्के आरक्षण देण्याला विरोध का केला ? तुम्ही जेएनयू मध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशी घोषणाबाजी का केली ?’, असे प्रश्‍न विचारले. या प्रश्‍नांना उत्तर देतांना कन्हैया कुमार यांनी एका तरुणाला, ‘तू भाजपचा आहेस का ?’ असा प्रतीप्रश्‍न केला. त्या वेळी तरुणाने ‘नाही’ असे उत्तर देत ‘मी ‘नोटा’चा (कोणताही उमेदवार लायक नाही, असे वाटल्यास ही सुविधा वापरता येते.) वापर करणार आहे’, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF