असदुद्दीन ओवैसी यांचा गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यास नकार !

  • ‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणार्‍यांना चपराक ! धर्मांधांच्या दृष्टीने हिंदू आणि अन्य पंथीय हे काफीरच असतात, हे हिंदू कधी जाणणार ? केवळ सत्तेसाठी एकत्र येण्याचे ढोंग करणारे मुसलमान हिंदूंना कायम तुच्छ लेखतात, हे हिंदू लक्षात का घेत नाहीत ?
  • या घटनेविषयी प्रकाश आंबेडकर कधीही तोंड उघडणार नाहीत किंवा उघडलेच, तर ते ओवैसी यांचे समर्थनच करतील !

संभाजीनगर – मागासवर्गीय आणि मुसलमान अशी युती करून वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे मजलीस-ए-इत्तेहादूल-मुसलमीनचे (एम्आयएम्चे) खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गौतम बुद्धांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास नकार दिला, तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्याचे टाळले. त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (या लाटेचा परिणाम मतदानात होऊन वंचित बहुजन आघाडी विजयापासून वंचित राहिल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)

१. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवैसी यांनी १८ एप्रिलला पदयात्रा काढली होती. चौसर भागातून पदयात्रा जात असतांना तेथील बौद्धविहारात असलेल्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी येण्याची आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी २ वेळा विनंती केली; पण त्याकडे प्रथम जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आणि नंतर हातवारे करत ओवैसी पुढे निघून गेले. (धर्मांधांचे हे खरे स्वरूप बौद्ध जाणतील तो सुदिन ! यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याऐवजी बौद्ध धर्म स्वीकारला होता, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२. इम्तियाज जलील यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी कसेबसे बुद्धांना अभिवादन करून परत पदयात्रा चालू केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now