छत्तीसगडमध्ये २ नक्षलवादी ठार

एकेक नक्षलवाद्याला ठार करण्यापेक्षा त्यांचा मुळासकट नायनाट करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार ? त्यांच्यावर ‘एअर स्ट्राईक’ का करत नाही ?

रायपूर (छत्तीसगड) – धनिकरका जंगलामध्ये सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये २ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. ठार झालेल्यांमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीस याचा समावेश आहे. वर्गीसवर ५ लाख रुपयांचे बक्षिस होते.


Multi Language |Offline reading | PDF