उत्तर कोरियाकडून पुन्हा शस्त्रास्त्र चाचणी

प्योंगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाने पुन्हा एकदा शस्त्रास्त्राची चाचणी घेतल्याची घटना समोर आली आहे. सरकारी वृत्तसंस्था ‘कोरियन सेंट्रल न्यूज’ने म्हटले की, देशाचे नेते किम जोंग उन यांनी संरक्षण विज्ञानाच्या संस्थेने बनवलेल्या शस्त्रास्त्र चाचणीचे निरीक्षण केले; मात्र हे शस्त्र कशा पद्धतीचे होते, हे स्पष्ट झालेले नाही. फेब्रुवारीमध्ये व्हिएतनामच्या हनोईमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत झालेल्या दुसर्‍या शिखर परिषदेनंतर प्रथमच उत्तर कोरियाने अशी चाचणी केली आहे. या परिषदेत उत्तर कोरियातील अण्वस्त्र नष्ट करण्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता.


Multi Language |Offline reading | PDF