हनुमान जयंती

चैत्र पौर्णिमा (१९ एप्रिल २०१९) या दिवशी असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने…

काही पंचांगांच्या मते हनुमान जन्मतिथी ही आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र शुक्ल पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.

प्रचलित पूजेतील प्रथा किंवा रुढीमागील कारणे !

महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर आणि तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आढळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना म्हणून वाममुखी (डावीकडे तोंड असलेला) मारुति किंवा दासमारुति पूजेत ठेवतात.

मारुतीच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृती

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळेच त्या देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यास साहाय्य होते.

उपासनेची कृती

१. मारुतिपूजनाच्या पूर्वी स्वतःला अनामिकेने (करंगळी जवळील बोटाने) शेंदूर लावावा.

२. मारुतीला रुईची फुले आणि पाने वाहावीत.

मारुतीच्या पूजेपूर्वी मारुतितत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या काढणे

मारुतीच्या पूजेपूर्वी, तसेच हनुमान जयंतीला घरी किंवा देवळात मारुतितत्त्व आकृष्ट करणार्‍या आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण मारुतितत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ सर्वांनाच होतो. या रांगोळ्यांमध्ये पिवळा, फिकट निळा, गुलाबी यांसारखे सात्त्विक रंग भरावेत.

नामजप

देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप. देवतेच्या नामजपाने देवतेचे तत्त्व अधिकाधिक ग्रहण होण्यासाठी, नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे आवश्यक असते. हनुमान जयंती या दिवशी हनुमानतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. त्याचा लाभ घेण्यासाठी त्या दिवशी मारुतीचा ‘श्री हनुमते नम: ।’ हा जप अधिकाधिक करावा.

संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘मारुति’

हनुमान जयंतीला काढावयाची रांगोळी !

हनुमानाचे तारक तत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी
हनुमानाचे मारक तत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी


Multi Language |Offline reading | PDF