भावजागृती झाल्यावर एकाच डोळ्यातून अश्रू वहाणे किंवा डोळ्यात पाणी स्थिर रहाण्यामागील कारण

श्री. निषाद देशमुख

१. जिवाची भावजागृती होतांना होणारी सूक्ष्म प्रक्रिया

‘प्रगट भावामुळे जिवाची भावजागृती झाल्यावर त्याच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भावशक्ती प्रगट होते. या शक्तीचा प्रवाह जिवाची चंद्रनाडीकडून सूर्यनाडीकडे याप्रकारे असते. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी दोन्हींमध्ये प्रगट भावशक्तीचा प्रवाह आरंभ झाल्याने सर्वसाधारणत: भावजागृती झाल्यावर जिवाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वहातात. या अवस्थेत जीव प्रगट भावाच्या स्तरावर असतो.

२. जीव प्रगट भावातून अप्रगट भावाकडे जात असतांना अष्टसात्त्विक भाव जागृत न होणे

जीव प्रगट भावातून अप्रगट भावाकडे जात असतांना अनाहतचक्राच्या ठिकाणी शक्ती प्रगट होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने न्यून होत जाते. यामुळे जिवाचे अष्टसात्त्विक भाव जागृत होण्याचे प्रमाण, उदा. डोळ्यांतून अश्रू येणे इत्यादी न्यून होत जातात. अप्रगट भावाचा टप्पा लगेच साध्य होत नसल्याने प्रगट भावातून अप्रगट भावाकडे जात असतांना जिवाची स्थिती प्रगट-अप्रगट भावावस्था किंवा अप्रगट-प्रगट भावावस्था अशी असते. यामुळे जिवाला एका डोळ्यातून अश्रू येणे, डोळे पाणावणे या प्रकारच्या अनुभूती येतात.

३. हनुमंताचे गुणगान असणारी भावगीते ऐकतांना साधकाच्या डाव्या डोळ्यातून अश्रू वहाण्याचे कारण

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताचे गुणगान असणारी भावगीते ऐकतांना साधकाची प्रगट-अप्रगट भावावस्था होती. या स्थितीत प्रगट भावामुळे अनाहतचक्राच्या ठिकाणी निर्माण झालेली भावशक्ती चंद्रनाडीपर्यंत प्रगट अवस्थेत, तर त्यापुढे अप्रगट अवस्थेत प्रवाहित होत होती. यामुळे भावजागृती झाल्यावर चंद्रनाडीत होणार्‍या प्रगट शक्तीच्या प्रवाहामुळे डाव्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले; पण सूर्यनाडीत प्रगट शक्तीप्रवाह नसल्याने उजव्या डोळ्यातून अश्रू वहात नव्हते.

४. साधकाच्या उजव्या डोळ्यात पाणी असून ते न वहाण्याचे कारण

साधकाच्या उजव्या डोळ्यात पाणी येऊन स्थिर रहाणेे हे त्याच्या अप्रगट-प्रगट भावावस्थेचे प्रतीक आहे. या स्थितीत अनाहतचक्राच्या ठिकाणी अप्रगट भाव कार्यरत असल्याने ईश्‍वरी शक्ती चंद्रनाडी ते सूर्यनाडी यांमध्ये अप्रगट-प्रगट या स्वरूपात प्रवाहित होते. सूर्यनाडीत भावशक्तीचे कार्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात प्रगटीकरण होते. यामुळे जिवाला भावाच्या बळावर कार्य करणे शक्य होते. जिवात अप्रगट भाव जागृत झाल्यावर त्याला भावयुक्त आणि परिपूर्ण कृती करणे शक्य होऊन आध्यात्मिक उन्नती करता येते.

५. अनुभूतीचा निष्कर्ष

प्रगट भावातून अप्रगट भावावस्थेत जातांना अनेक पालट होत असल्याने जिवाने अनुभूतींच्या अभ्यास करत भावपूर्ण आणि परिपूर्ण कृतीकडे लक्ष ठेवणे अधिक आवश्यक आहे. या अनुभूतीतून देवाने प्रगट भावावस्थेतून अप्रगट भावावस्थेकडे होणारी यात्रा समष्टीला शिकवली आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, गोवा. (१९.१०.२०१८, दुपारी १.४७)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now