सत्यान्वेषी, निर्भीड, वस्तूनिष्ठ पत्रकारितेचा आदर्श असलेल्या आणि साधनेविषयी मार्गदर्शन करून व्यक्तीत अंतर्बाह्य पालट घडवणार्‍या ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांचे कौतुकोद्गार !

‘वाचकवृद्धी मोहिमे’च्या निमित्ताने…

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘पत्रकारितेचा पुढील आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ‘सनातन प्रभात’ कार्यरत आहे,

‘कीं घेतले व्रत न हें अम्हिं अंधतेने ।

बुद्ध्याचि वाण धरिले करिं हे सतीचे ॥’

– स्वातंत्र्यवीर सावरकर

‘सनातन प्रभात’ म्हणजे वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवर अचूक मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच ! २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी जनकल्याणाची अनेक उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राची निर्मिती केली. दिशाहीन समाजाला दिशा मिळावी, राजकारणी व्यक्तींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, जनतेच्या मनात राष्ट्र आणि स्वधर्म यांच्याप्रती प्रेम निर्माण व्हावे, तसेच साधकांना साधनेविषयी प्रतिदिन मार्गदर्शन मिळावे आदी हेतूंनी आर्थिक हानी सोसूनही हे वृत्तपत्र चालू केले. परात्पर गुरु डॉक्टरांनी ज्या उदात्त हेतूंनी ‘सनातन प्रभात’ चालू केले, त्यांतील बहुतांश उद्देश आज सफल होतांना दिसत आहेत. आज ‘सनातन प्रभात’चा विशिष्ट वाचक वर्ग निर्माण झाला आहे. ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने त्यांचे विचार आणि कृती यांत आमूलाग्र पालट होत आहेत अन् हेच सनातनचे यश आहे.   

ठिकठिकाणच्या वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढलेलेे कौतुकोद्गार पुढे दिले आहेत. त्यावरून ‘सनातन प्रभात’चे महत्त्व आणि वाचकांची नियतकालिकावरील विश्‍वासार्हता लक्षात येते.

सनातन प्रभातच्या वाचकांचे बोल… ! माझ्या धर्मावर आलेल्या संकटांची मला जाणीव झाली आहे. आता मीही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वतोपरी कृती करणार आहे !

दिनांक १७ एप्रिलच्या अंकात आपण दैनिकाच्या वाचकांनी केलेल्या धर्मरक्षणाच्या कृती पाहिल्या आज आपण त्यापुढील भाग पहाणार आहोत.

६. अन्य वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रिया

अ. एक वाचक उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘मृत हिंदू जागृत होतील, असे तुमचे दैनिक आहे. आम्हाला तुमचे कार्य आवडते.’’

आ. ‘सनातन सत्यदर्शन विशेषांका’चे वितरण करणार्‍या साधकांना चिंचवड, जिल्हा पुणे येथील श्री. नाइकोडे भेटले. ते म्हणाले, ‘‘मी या अंकाची वाटच पहात होतो. मला अंक चालू करायचा आहे.’’ (सप्टेंबर २०१८)

इ. श्री. पंकज गरगटे, पुणे या धर्मप्रेमींनी सांगितले, ‘‘पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मला दैनिक चालू करा. धर्मकार्यात माझा नेहमी सहभाग असेल !’’ (नोव्हेंबर २०१८)

ई. पुण्यातील श्री. सचिन गुळवणी यांना ‘सनातन प्रभात’ चालू करण्याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘हे हिंदुत्वाचे कार्य आहे. तुम्ही मला विनंती करू नका. हे माझे आद्यकर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळूनच हे कार्य करायला हवे.’’ त्यांनी घरी त्वरित साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू केला. (जानेवारी २०१९)

उ. पुण्यातील एक जिज्ञासू म्हणाल्या, ‘‘माझ्या १ वर्षाच्या मुलाला दैवी वातावरण मिळावे, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत’, हीच देवाची इच्छा असावी; म्हणून तुम्ही आम्हाला ‘सनातन प्रभात’विषयी सांगत आहात.’’ (जानेवारी २०१९)

ऊ. भोर, पुणे येथील जिज्ञासू श्री. सुनील घोडेकर म्हणालेे, ‘‘हे दैनिक म्हणजे धन आहे. ते तुम्ही आम्हाला देत आहात.’’ (फेब्रुवारी २०१९)

‘सध्याच्या काळात आवश्यक असलेले धर्मजागृतीचे कार्य केवळ ‘सनातन प्रभात’च करत आहे. हा अंक प्रत्येक हिंदूने वाचायला हवा. अधिकाधिक जणांपर्यंत अंक पोचवण्यासाठी तुम्हाला काही साहाय्य लागल्यास मी करीन’, असेही अनेक वाचकांनी सांगितले.

७. सनातनचे कार्य अवगत झाल्याने धर्मकार्यासाठी वाचक देत असलेले महत्त्वपूर्ण योगदान !

नियतकालिक वाचून बरेच वाचक राष्ट्र आणि धर्म कार्यार्थ राबवण्यात येणार्‍या उपक्रमांसाठी अर्पण गोळा करणे, विज्ञापने मिळवून देणे, स्वतःचे सभागृह अथवा वास्तू वापरण्यास देणे, साधकांचे भोजन, तसेच निवास यांची व्यवस्था करणे, प्रवचनाचे आयोजन करणे आदी धर्मसेवा स्वतःहून करत आहेत.

‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या सूचना वाचून अनेक वाचक सनातनच्या आश्रमातील विविध सेवांमध्ये (उदा. संगणक दुरुस्ती, ग्रंथ संकलन आदी सेवांमध्ये) सहभागी होण्याची इच्छा दर्शवत आहेत आणि सेवेसाठीही येत आहेत. काही वाचकांना कार्यात सहभागी होण्याची इच्छा असूनही ते वेळेअभावी येऊ शकत नाहीत. अशा वेळी ते ‘धर्मकार्यासाठी आवश्यक साहित्य, उपकरणे आदींची आवश्यकता !’ या विषयीच्या सूचना वाचून त्यांच्या खरेदीसाठी उत्स्फूर्तपणे आर्थिक साहाय्य करत आहेत. अनेक जण विशेषांकांसाठी विज्ञापने देऊन अथवा विशेष औचित्य साधून धन अर्पण करत आहेत.

‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘वाचक राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सक्रीय व्हावेत अन् त्यांनी साधना चालू करावी’, या व्यापक उद्देशांनी हे नियतकालिक चालू केले होतेे. ‘गुरुदेवांचा हा संकल्प फलद्रूप होत आहे’, हे वरील उदाहरणांवरून लक्षात येते.

विविध माध्यमांतून लाभत असलेले वाचकांचे प्रेम, त्यांचे सहकार्य आणि त्यांना वाटणारी विश्‍वासार्हता यांमुळे अनेक अडचणी येऊनही या नियतकालिकाची वाटचाल चालू राहिली आणि पहाता पहाता ‘सनातन प्रभात’ने २० वर्षांचा मोठा कालावधी पूर्ण केला. वाचकांनी यापुढेही ‘सनातन प्रभात’ला असेच सहकार्य केल्यास या नियतकालिकाची घौडदोड अशीच चालू राहील, हे निश्‍चित ! वाचकांना ज्ञानाचे भांडार नेहमी उपलब्ध करून देण्यास ‘सनातन प्रभात’ सदैव प्रयत्नरत राहील !

‘समाजासाठी ‘दीपस्तंभ’ म्हणून दिशादर्शन करणार्‍या ‘सनातन प्रभात’चे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो’, हीच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना !’  (समाप्त)

संकलक : (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF