भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी एकत्र आले पाहिजे ! – ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’चे आवाहन

  • चर्च संघटनांनी कधी काँग्रेस आणि अन्य हिंदुद्वेषी पक्ष यांच्या विरोधात असे आवाहन केलेेले नाही, याचाच अर्थ ते धर्माच्या नावानेच भाजप आघाडी सरकारला विरोध करत आहेत, हे स्पष्ट होते !
  • भारतातील चर्च संघटना कधीही चर्चमधील पाद्य्रांकडून नन्स, लहान मुले आणि महिला यांच्या होणार्‍या लैंगिक शोषणावर तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

कोट्टायम (केरळ ) – भाजपने केरळ आणि पूर्वोत्तर राज्ये येथे ख्रिस्ती समुदायाची मते मिळवण्याचा प्रयत्न केला असला, तरीसुद्धा ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’ने (सीएस्आयने) भाजप आघाडी सरकारच्या विविध धोरणांना तीव्र विरोध केला आहे. सीएस्आय नियंत्रक बिशप थॉमस के. ओमेन यांनी देशाच्या लोकांना खुले पत्र पाठवून त्यांना सरकारला पराभूत करण्यासाठी एकत्र उभे रहाण्यास सांगितले आहे.

तेलंगण, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये सीएस्आय ही भारतातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठा ख्रिस्ती संघटना आहे. तिच्या मते, गेल्या काही वर्षांपासून, विशेषत: गेल्या ४ वर्षांत केंद्रातील शासनावर लोक अत्यंत अप्रसन्न आहेत.


Multi Language |Offline reading | PDF