सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह अन्य ३ राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्षांना पोलिसांकडून ३ दिवसांसाठी तडीपारीची नोटीस !

सिंधुदुर्ग – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना पोलिसांकडून १५ एप्रिलला ३ दिवसांसाठी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचसमवेत ३ राजकीय पक्षांच्या तालुका अध्यक्षांसह ५ जणांना पोलिसांनी १६ एप्रिल या दिवशी तडीपारीची नोटीस बजावली आहे. यात शिवसेना, भाजप आणि स्वाभिमान पक्ष या राजकीय पक्षांच्या तालुका अध्यक्षांचा समावेश आहे. २१ ते २३ एप्रिल या कालावधीत तालुक्यात या ५ जणांनी अनुपस्थित रहावे, असे म्हटले आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांनी ५ जणांनाही हद्दपारीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीविषयीचे म्हणणे सादर करण्याचीदेखील मुदत देण्यात आली आहे. मनसेच्या जिल्हाध्यक्षांना २१ ते २३ एप्रिल या काळात त्यांनी वेंगुर्ल्यासह कुडाळमध्ये थांबू नये, असे नोटिसीत म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF