सत्यान्वेषी, निर्भीड, वस्तूनिष्ठ पत्रकारितेचा आदर्श असलेल्या आणि साधनेविषयी मार्गदर्शन करून व्यक्तीत अंतर्बाह्य पालट घडवणार्‍या ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांचे कौतुकोद्गार !

‘वाचकवृद्धी मोहिमे’च्या निमित्ताने…

‘पत्रकारितेचा पुढील आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ‘सनातन प्रभात’ कार्यरत आहे,

‘कीं घेतले व्रत न हें अम्हिं अंधतेने ।
बुद्ध्याचि वाण धरिले करिं हे सतीचे ॥’

– स्वातंत्र्यवीर सावरकर

‘सनातन प्रभात’ म्हणजे वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवर अचूक मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच ! २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी जनकल्याणाची अनेक उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राची निर्मिती केली. दिशाहीन समाजाला दिशा मिळावी, राजकारणी व्यक्तींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, जनतेच्या मनात राष्ट्र आणि स्वधर्म यांच्याप्रती प्रेम निर्माण व्हावे, तसेच साधकांना साधनेविषयी प्रतिदिन मार्गदर्शन मिळावे आदी हेतूंनी आर्थिक हानी सोसूनही हे वृत्तपत्र चालू केले. परात्पर गुरु डॉक्टरांनी ज्या उदात्त हेतूंनी ‘सनातन प्रभात’ चालू केले, त्यांतील बहुतांश उद्देश आज सफल होतांना दिसत आहेत. आज ‘सनातन प्रभात’चा विशिष्ट वाचक वर्ग निर्माण झाला आहे. ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने त्यांचे विचार आणि कृती यांत आमूलाग्र पालट होत आहेत अन् हेच सनातनचे यश आहे.   

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

ठिकठिकाणच्या वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढलेलेे कौतुकोद्गार पुढे दिले आहेत. त्यावरून ‘सनातन प्रभात’चे महत्त्व आणि वाचकांची नियतकालिकावरील विश्‍वासार्हता लक्षात येते.

सनातन प्रभातच्या वाचकांचे बोल… ! माझ्या धर्मावर आलेल्या संकटांची मला जाणीव झाली आहे. आता मीही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वतोपरी कृती करणार आहे !

दिनांक १६ एप्रिलच्या अंकात आपण  दैनिकाच्या वाचनामुळे वाचक कृतीशील होऊन त्यांनी तो समाजापर्यंत पोचवण्यासाठी केलेले साहाय्य पाहिले आज आपण त्यापुढील भाग पहाणार आहोत.

५. काही वाचकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कृती

५ अ. तणावग्रस्त विद्यार्थ्याला नामजपाचे महत्त्व सांगणारे अंबड (संभाजीनगर) येथील एक प्राध्यापक !

अंबड येथील एक प्राध्यापक म्हणाले, ‘‘मी विद्यार्थ्यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील काही सूत्रे सांगतो. एकदा एक विद्यार्थी तणावग्रस्त होता. घरातील वातावरणामुळे तो निराश होता. मी त्याची समजूत काढून त्याला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला.’’ (ऑगस्ट २०१७)

५ आ. ‘सनातन प्रभात’मधील ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ या उपकरणाची माहिती वाचून स्वतः प्रयोग करून पहाणारे पिंपरी (पुणे) येथील श्री. विशाल इडगे !

‘मी ‘माहिती तंत्रज्ञान’ या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टीकोनातून पडताळून पहाण्याची मला सवय आहे. ‘सनातन प्रभात’मध्ये मी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यू.टी.एस्.) या उपकरणाची माहिती वाचली. मी सनातन संस्थेची उत्पादने आणि बाजारातील इतर उत्पादने यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी हे उपकरण मागवले. त्याद्वारे अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की, सनातन संस्थेच्या उत्पादनांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे. कोणतीही कृती करतांना नामजपाची जोड असली, तर आपल्याभोवती सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढते.’ (नोव्हेंबर २०१७)

(‘सनातनची उत्पादने सात्त्विक आहेत. श्री. विशाल इडगे यांना ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ या उपकरणाद्वारे उत्पादनांचा तुलनात्मक अभ्यास करून ‘सनातनच्या उत्पादनांत अधिक सकारात्मक ऊर्जा आहे’, असा निष्कर्ष काढल्याने हे वैज्ञानिक कसोटीवरही सिद्ध झाले आहे.’ – संकलक)

५ इ. वयाच्या ७५ व्या वर्षी ‘सनातन प्रभात’चे वितरण करणारे श्री. जनार्दन बाऊस्कर !

अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील श्री. जनार्दन बाऊस्कर (वय ७५ वर्षे) यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाची इतकी आवड आहे की, ते स्वतःला दैनिक मिळावेे; म्हणून प्रतिदिन वितरकांकडे जाऊन दैनिक आणतात आणि काही दैनिकांचे नियमित वितरणही करतात. (फेब्रुवारी २०१८)

संकलक : (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०१९)                                                                         (क्रमश:)  


Multi Language |Offline reading | PDF