(म्हणे) फादरचे विधान आक्षेपार्ह नाही, तर भाजपच धार्मिक द्वेष पसरवते !

फादर कॉसेसांव डिसिल्वा यांच्या द्वेषमूलक भाषणाला गोव्यातील आपचा पाठिंबा

निवडणुकीच्या रणधुमाळीत ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करण्याचा आपचा प्रयत्न ! अशा आपला हिंदूंनी घरीच बसवावे !

पणजी – अवर लेडी चर्चचे फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी द्वेषमूलक वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत असतांना आणि चर्च संस्थेनेही याविषयी दिलगिरी व्यक्त केलेली असतांना निवडणुकीच्या या रणधुमाळीत आपचे लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी फादर डिसिल्वा यांच्या द्वेषमूलक वक्तव्याचे समर्थन केले आहे. (यावरून एल्विस गोम्स किती धर्मांध आहेत, ते दिसून येते ! असे लोकप्रतिनिधी निवडून आल्यास गोव्याचा धार्मिक सलोखा न बिघडल्यासच नवल ! – संपादक) गोव्यात आप लोकसभेच्या दोन्ही जागांवर निवडणूक लढवत आहे.

एल्वीस गोम्स पुढे म्हणाले, फादर डिसिल्वा यांच्या विधानात काय चुकले ? मला व्यक्तीश: यामध्ये काही चुकले आहे असे वाटत नाही. या चलचित्रामध्ये काहीच चुकीचे नाही. प्रत्येक दिवशी भाजप समाजात धार्मिक द्वेष पसरवत असल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच घुसखोरांना देशातून हाकलून लावण्यात येणार असल्याचे विधान केले आहे. हे घुसखोर कोण आहेत ? हिंदू आणि शिख सोडून इतर सर्व घुसखोर आहेत. (हिंदू आणि शिख सोडून इतर घुसखोर आहेत, यात चूक काय आहे ? ख्रिस्त्यांना या देशात येण्यास कधी बंदी घातली कि विरोध केला आहे का ? भारताचे २ तुकडे करून मुसलमानांना धर्मानुसार ते देण्यात आले. त्यामुळे त्यांनी तेथून परत भारतात अवैधरित्या येणे ही घुसखोरीच ! त्यांना हाकललेच पाहिजे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now