चर्च संस्थेचा माफीनामा; मात्र कारवाई करण्याविषयी कोणतीच वाच्यता नाही !

फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी द्वेषमूलक भाषण केल्याचे प्रकरण

  • प्रसारमाध्यमे ख्रिस्त्यांच्या या भूमिकेविषयी कधी तोंड उघडणार नाहीत; कारण बहुतेक प्रसारमाध्यमे ही ख्रिस्त्यांची बटीकच बनली आहेत !
  • राजकारण्यांनी ख्रिस्त्यांचे लांगूलचालन केल्यामुळेच ख्रिस्ती धर्मगुरु असे उद्दाम बनले आहेत !

पणजी, १६ एप्रिल (वार्ता.) – गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविषयी अवर लेडी चर्चचे फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी द्वेषमूलक वक्तव्य केल्याविषयी गोव्यातील अवर लेडी ऑफ स्रोज चर्चने जाहीर क्षमा मागितली आहे. याविषयी चर्चने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे चर्च संस्थेने फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी चर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करूनही त्यांच्यावर कोणती कारवाई होईल किंवा असे द्वेषमूलक विधान यापुढे अन्य कोणताही फादर करणार नाही, याविषयी ठोस उपाययोजना केल्याची वाच्यता या पत्रकात केलेली नाही. (ही गोमंतकियांच्या डोळ्यांत धूळफेकच आहे. यातून चर्च संस्थेची धर्मांधताच समोर येते. हिंदुत्वनिष्ठांवर गरळओक करणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष याविषयी गप्प का ? – संपादक)

फादर कॉसेसांव डिसिल्वा चर्चमध्ये भाषण (सर्मन) करतांना अमित शहा यांना सैतान, असे संबोधले होते, तर मनोहर पर्रीकर यांच्यावर देवाचा कोप झाल्यामुळेच ते कर्करोगाने वारल्याचे विधान केले होते. फादर कॉसेसांव डिसिल्वा यांचे हे भाषण असलेले चलचित्र (व्हिडिओ) व्हायरल झाल्यानंतर याविषयी सर्वच स्तरांतून जोरदार टीका होऊ लागली आहे. एखादे फादर अशी वक्तव्ये कशी करू शकतात ? असे प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहे. याविषयी भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवल्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. यामुळे चर्चने अखेर याविषयी पत्रक प्रसिद्ध करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. (निवडणूक आयोगाने या माफीनाम्याला बळी न पडता फादर कॉसेसांव यांच्यावर कठोर कारवाई केल्यासच पुढे असे प्रकार घडणार नाहीत, हे लक्षात घ्यावे ! – संपादक)

चर्च संस्थेचे आवाहन डावलून फादर डिसिल्वा यांनी थेट चर्चमध्ये भाजपविरोधात केले भाषण

चर्चसंस्थेने सर्व फादरना मतदानाविषयी जागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भाविकांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदानास प्रवृत्त करण्यास सांगण्यात आले आहे; मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देऊ नका, असेही बजावण्यात आले होते, तरीही फादर डिसिल्वा यांनी थेट चर्चमध्ये जमलेल्या भाविकांसमोर भाजपविरोधाची भूमिका घेतली. यामुळे चर्चला क्षमायाचना करावी लागली.

फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी यापूर्वीही केला होता काँग्रेसचा प्रचार

फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी यापूर्वीही ताळगाव येथे चर्चचे फादर असतांना वर्ष २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. यामुळे त्या वेळीही गदारोळ माजला होता. (त्याच वेळी निवडणूक आयोगाने कारवाई केली असती, तर ही वेळ पुन्हा आली नसती. असा मवाळ निवडणूक आयोग देणारी लोकशाही काय कामाची ? – संपादक)

(म्हणे) भावना दुखावल्याविषयी क्षमा मागतो ! – डायोसेसन सेंटर फॉर कॉम्युनिकेशन्स मिडिया (सीबीसीआय)

फादर डिसिल्वा यांच्या विधानामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास आम्ही क्षमा मागतो, असे डायोसेसन सेंटर फॉर कॉम्युनिकेशन्स मिडियाचे (सीबीसीआय) फादर ओलावो यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF