भोसरी (जिल्हा पुणे) येथील अत्तूकल देवीच्या मंदिरात रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

हिंदु जनजागृती समितीच्या १. कु. क्रांती पेटकर यांचा सत्कार करतांना धर्माभिमानी

भोसरी (पुणे), १६ एप्रिल (वार्ता.) – येथील अत्तूकल देवीच्या मंदिरामध्ये १३ एप्रिलला रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘श्रीरामाची वैशिष्ट्ये, रामराज्य आणि सध्याच्या व्यवस्थेमधील त्रुटी’ या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमापूर्वी मंदिराच्या पुजार्‍यांनी सामूहिक रामनामजप आणि रामरक्षा पठण करवून घेतले. कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त साकडे घालण्यात आले, तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी हिंदु राष्ट्रासाठी कार्यरत रहाण्याची शपथ घेतली. ४० हून अधिक जण या वेळी उपस्थित होते. उपस्थित धर्मप्रेमींनी कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली, तसेच ‘पहिल्यांदाच अशी माहिती समजली’, अशा भावनाही व्यक्त केल्या.

वैशिष्ट्यपूर्ण

कार्यक्रमापूर्वी त्या भागात पुष्कळ पाऊस पडत होता. वीजही गेली होती. त्यामुळे अनेक जण घरातून बाहेर पडू शकत नव्हते, तसेच कार्यक्रम चालू होण्यासही विलंब होत होता, तरीही ज्या धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ते सकारात्मक होते. संस्कृती रक्षणाचा आणि हिंदुत्वाचा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा, अशी त्यांची तळमळ होती. कार्यक्रम झाल्यानंतर ज्या धर्मप्रेमींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यांनी साधकांना ‘कार्यक्रमातील सुधारणा सांगा’, असेही साधनेच्या दृष्टीने विचारले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now