मज स्थान मिळावे तव गुरुचरणा ।

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. श्रेया मेढेकर एक आहे !

कु. श्रेया मेढेकर

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. श्रेया वैभव मेढेकर (वय १० वर्षे) हिचा चैत्र शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.४.२०१९) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना कवितास्वरूप पुढील पत्र पाठवले आहे. आता तिची पातळी ५५ टक्के आहे.

कु. श्रेया मेढेकर हिला वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

या गुरुराया मम मंदिरा ।
या गुरु तुम्ही माझ्या झोपडीत ॥ १ ॥

या मी देईन तुम्हाला उष्टी बोरं ।
मी देईन तुम्हाला भाकर-ठेचा ॥ २ ॥

नमस्कार माझा स्वीकारावा ।
मज स्थान मिळावे तव गुरुचरणा ॥ ३ ॥

गुरुराया, माझे अहं-स्वभावदोष नष्ट व्हावेत ।
अन् तुम्हाला अपेक्षित असे मी घडावे ।
हीच प्रार्थना माझ्या वाढदिवशी तवचरणी ॥ ४ ॥

– कु. श्रेया वैभव मेढेकर (वय १० वर्षे), पुणे (१०.४.२०१९)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF