केवळ विजय मल्ल्या यांनीच नव्हे, तर ३६ उद्योगपतींनी पलायन केले ! – अंमलबजावणी संचालनालयाची न्यायालयात निलाजरी स्वीकृती

  • भाजपच्या राज्यात उद्योगपती घोटाळे करून फरार झाले, हे लक्षात घ्या !
  • परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याच्या घोषणा करणार्‍या भाजपच्या राज्यात घोटाळे करणारे देशातून पळून जातात, हे भाजपला लज्जास्पद !
  • अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात आता सांगितलेली माहिती यापूर्वीच देशातील जनतेला का सांगितली नाही ? सरकारने ही माहिती का  दिली नाही ? अशी किती माहिती सरकारने दडवून ठेवली आहे ?

नवी देहली – विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांनीच नव्हे, तर अलीकडच्या काळात ३६ उद्योगपतींनी देशातून पलायन केले आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात सांगितले.

सुषेन मोहन गुप्ता

असे सांगूनच ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेले संरक्षणक्षेत्रातील दलाल सुषेन मोहन गुप्ता हेही पळून जाण्याची शक्यता असल्याने अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला.


Multi Language |Offline reading | PDF