(म्हणे) ‘मुसलमानांनी संघटित होऊन मतदान केल्यास मोदी यांचा पराभव होईल !’ – काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांचे धर्माच्या आधारे आवाहन

  • प्रत्येक तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष मुसलमानांना मतांसाठी आवाहन करत आहे. हा राज्यघटनेचा अवमान आहे, हे लक्षात घ्या !
  • इतर वेळी निधर्मीवादाची टिमकी वाजवणारी काँग्रेस किती धर्मांध आहे, हे यावरून स्पष्ट होते. आता निवडणूक आयोगाने केवळ २-३ दिवसांची प्रचारबंदीची कारवाई न करता अशांवर कायमचीच बंदी घालायला हवी !

पाटलीपुत्र – मुसलमान बंधूंनो, मी तुम्हाला सतर्क करण्यासाठी येथे आलो आहे. ओवैसीसारख्या लोकांना तुमच्यासमोर आणून तुमच्यात आणि तुमच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर तुम्ही संघटित झालात आणि मतदान केले, तर मोदी यांचा पराभव होईल, असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी केले. ते बिहारच्या कटिहार येथील महाआघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF