पाकच्या सिंध प्रांतामध्ये वर्ष २०१८ मध्ये १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे बलपूर्वक धर्मांतर अन् विवाह

  • भारतात गेली ५ वर्षे भाजपचे सरकार असतांना त्याने किती प्रकरणात पाकला तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांविषयी जाब विचारला ?
  • पाकचे पंतप्रधान इम्रान खान भारतातील अल्पसंख्यांकांविषयी तोंड उघडतात. असा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी पाकला जाब विचारण्यासाठी का केला नाही ?
  • भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्याविना जगभरातील विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंच्या रक्षणासाठी काही प्रयत्न होण्याची शक्यता नाहीच !

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील स्वतंत्र मानवाधिकार संघटनेने पाकमध्ये वर्ष २०१८ मध्ये १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे बलपूर्वक धर्मांतर अन् नंतर विवाह करून दिल्याची माहिती तिच्या अहवालात दिली आहे. सिंधमधील उमरकोट, थरपारकर, मीरपुरखास, बदीन, कराची, टंडो अल्लाहयार, कश्मोर आणि घोटकी येथे या घटना घडल्याचे म्हटले आहे. या संघटनेने खासदारांना या विरोधात कायदा करण्याचीही मागणी केली.

१. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने त्याच्या ३३५ पानांच्या वर्ष २०१८ च्या अहवालात म्हटले आहे की, सरकारने अशा घटना रोखण्यासाठी थोडासा प्रयत्न केला.

२. सिंधमध्ये ‘सिंध बाल विवाह नियंत्रण अधिनियम २०१३’ या कायद्याची प्रभावी पद्धतीने कार्यवाही झालेली नाही. सरकारकडूनही यावर ठोस कृती करण्यात आली नाही.

३. पोलिसांनी या घटनांमध्ये आरोपींना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला किंवा काही ठिकाणी केला नसला, तरी त्यांनी हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्नही केले नाहीत.

४. या व्यतिरिक्त स्वतःच्या धर्मश्रद्धांनुसार वागण्याचा प्रयत्न करणार्‍या अल्पसंख्यांकांवर अत्याचार करण्यात आले. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचे या अहवालात म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF