भगवान हनुमानाचे आक्षेपार्ह चित्र फेसबूकवर पोस्ट करणार्‍या दोघांना अटक

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे भगवान हनुमानाचे आक्षेपार्ह चित्र फेसबूकवर पोस्ट केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. राज्यातील झुंडपुरा गावामधून या दोघांना अटक करण्यात आली. या चित्रामध्ये भगवान हनुमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक झाल्याचे दाखवण्यात आले आहे. (हिंदू संघटित नसल्यामुळेच आणि त्यांच्यात धर्माभिमान नसल्यामुळेच देवतांचा अशाप्रकारे वारंवार अवमान केला जातो ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF