लोकसेवा आयोगाच्या मनोचिकित्सा साहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या प्रश्‍नपत्रिकेत शबरीमला मंदिराच्या धार्मिक परंपरेचा अवमान करणारा प्रश्‍न

  • लोकसेवा आयोगाचा हिंदुद्वेष !
  • केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारा लोकसेवा आयोग अशा प्रकारचा प्रश्‍न कसा काय विचारू शकतो ? केंद्रातील भाजप सरकारच्या हे लक्षात येत नाही का ?

थिरूवनंतपूरम् (केरळ) – लोकसेवा आयोगाच्या वैद्यकशास्त्राच्या मनोचिकित्सा शाखेत साहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठीच्या प्रश्‍नपत्रिकेत शबरीमला मंदिराच्या धार्मिक परंपरेचा अवमान करणारा प्रश्‍न विचारण्यात आला होता. ‘२८ सप्टेंबर २०१८ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शबरीमला अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या १० ते ५० वर्षे वयोगटातील पहिल्या महिला कोण होत्या?’ असा प्रश्‍न या प्रश्‍नपत्रिकेत विचारण्यात आला होता. हिंदु धर्मपरंपरेनुसार शबरीमला अय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या याविषयीच्या निर्णयानंतर हिंदूंनी आंदोलनही छेडले होते. या पार्श्‍वभूमीवर लोकसेवा आयोगाने प्रश्‍नपत्रिकेत असा प्रश्‍न विचारून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF