पाकिस्तानमध्ये दूध १८० रुपये प्रतिलिटर

  • भारतात प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने होणारी गोहत्या थांबली नाही, तर भारतातही उद्या हीच परिस्थिती निर्माण होणार, यात शंका नाही !
  • ज्यांना पाकमध्ये जाण्याची स्वप्ने पडतात, पाकप्रेमाचा उमाळा येत असतो, त्यांनी पाकमध्ये काय वाढून ठेवले आहे, हे आधी पहावे !

इस्लामाबाद – ‘कराची डेअरी फार्मर्स असोसिएशन’ने दुधाच्या दरांमध्ये प्रतिलिटर २३ रुपये इतकी वाढ केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमधील दुधाचे दर १२० रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. किरकोळ बाजार भावानुसार तर दुधाचे दर १८० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोचले आहेत. प्रशासनाने दूध विक्री करणार्‍या असोसिएशनने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. वाढीव दराने दूध विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुलवामा येथील आक्रमणानंतर भारतानेही पाकला शेतमालाचा पुरवठा बंद केला. त्यानंतर पाकमध्ये टोमॅटोचे दर २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now