श्रीलंकेत हिंदूंचे होणारे बलपूर्वक धर्मांतर रोखण्यासाठी हिंदू संघटित

चर्चा करतांना धर्माभिमानी

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत हिंदूंचे होणारे बलपूर्वक धर्मांतर आणि मंदिरांवर होणारे आक्रमण रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना काढण्यासाठी अनुमाने ७५ धर्मप्रेमी हिंदू श्रीलंकेच्या मन्नार जिल्ह्यात नुकतेच संघटित झाले होते. तसेच स्थानिक आणि प्रांतीय निवडणुकांमध्ये हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कटीबद्ध असलेल्या हिंदु उमेदवाराला मतदान करण्याच्या सूत्रावर या वेळी चर्चा करण्यात आली. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि भारत या देशांतील हिंदू या बैठकीत सहभागी झाले होते. प्रत्येक हिंदूच्या घरावर नंदीध्वज फडकावणे आणि प्रत्येकाने ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा पवित्र ग्रंथ घरात ठेवणे यांविषयी बैठकीत एकमत झाले. हिंदु धर्माचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी गोव्यातील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याविषयी या वेळी चर्चा करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF