उत्तरप्रदेशातून मोठा शस्त्रसाठा आणि मद्य जप्त

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथून मोठा शस्त्रसाठा आणि मद्य जप्त केले आहे. नेहमीच्या तपासणीच्या वेळी हा शस्त्रसाठा पोलिसांना आढळून आला. यामध्ये ४०५ अवैध हत्यारे, ७३९ काडतुसे, २ कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटी रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. ‘निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला शस्त्रसाठा हा मोठा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने जमा करण्यात आला असावा’, अशी शक्यता पोलीस अधीक्षक एन्. कोलांची यांनी व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF