दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात ‘द्विदशकपूर्ती वर्धापनदिन विशेषांका’चे भावपूर्ण वातावरणात पूजन !

रामनाथी – दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीला २० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ १४ एप्रिल या दिवशी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘द्विदशकपूर्ती वर्धापनदिन विशेषांका’चे येथील कार्यालयात भावपूर्ण पूजन करण्यात आले. सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. चैतन्य दीक्षित यांनी हे पूजन केले. त्यानंतर सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांनी दैनिकाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विद्यमान समूह संपादक ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. नागेश गाडे यांच्यासह ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या सर्व साधकांनी भावपूर्ण नमस्कार केला. या वेळी ‘सनातन प्रभात’ची सेवा करतांना साधनेच्या स्तरावर झालेल्या चुकांसाठी श्री सरस्वतीदेवीच्या चरणी क्षमायाचना करण्यात आली. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होता येत असल्याविषयी आणि साधना होत असल्याविषयी उपस्थित साधकांनी मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली. वर्ष १९९९ मध्ये पहिला अंक प्रकाशित झाला तेव्हा आणि नंतर प्रत्येक वर्धापनदिनी असे २१ वेळा दैनिकाच्या अंकाचे पूजन करून दैनिकाचे पूजन करण्याची ‘सनातन प्रभात’ची परंपरा अखंडित आहे.

पूजन करण्यात आलेला द्विदशकपूर्ती वर्धापनदिन विशेषांक
वर्धापनदिन विशेषांकाचे पूजन करतांना श्री. चैतन्य दीक्षित

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF