फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी राय चर्चमध्ये द्वेषमूलक भाषण केल्याच्या प्रकरणी अन्वेषणाला प्रारंभ !

निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडून अहवाल मागवून कारवाई करण्याचे दिले आश्‍वासन !

पणजी,१५ एप्रिल (वार्ता.)-प्रदूषणाला चालना दिल्याने आणि ख्रिस्त्यांच्या शासकीय सुट्ट्या रहित केल्याने देवाचा कोप होऊन गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कर्करोगाने वारले,असे द्वेषमूलक वक्तव्य (या मार्गदर्शनाला सर्मन असे म्हणतात)फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी राय चर्चमध्ये ख्रिस्त्यांसमोर केले.या भाषणात फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमवेतच पंतप्रधान नरेंद मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे.याविषयी एक चलचित्र (व्हिडिओ)व्हायरल झाले आहे.द्वेषमूलक भाषणामुळे गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो.त्यामुळे या प्रकरणी फादर डिसिल्वा यांच्यावर कारवाई करावी,अशी तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती.या तक्रारीची नोंद घेऊन जिल्हा निवडणूक अधिकारी अजिय रॉय यांनी फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी केलेल्या भाषणाच्या चलचित्राचे अन्वेेषण करण्यास प्रारंभ केला आहे.निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडून अहवाल मागवला आहे,तसेच फादर कॉसेसांव डिसिल्वा यांच्यावर अहवालावर आधारित कारवाई करण्याचे आश्‍वासनही निवडणूक आयोगाने दिले आहे.त्याचप्रमाणे चर्च संस्थेनेही फादर कॉसेसांव यांच्या द्वेषमूलक भाषणाची नोंद घेतली असून त्यांना उपस्थित रहाण्यासाठी समन्स पाठवले आहे.(असे असले,तरी चर्च संस्थेने ठोस कारवाई केली,तरच या समन्सला अर्थ आहे अन्यथा संस्थेवर कलंक नको,म्हणून कारवाईचे नाटक केले,असे वाटेल !-संपादक)

फादर कॉसेसांव डिसिल्वा यांच्या द्वेषमूलक भाषणाचे सर्वत्र उमटले पडसाद द्वेषमूलक प्रचार करणे चुकीचे ! -आवडा वेगस,सामाजिक कार्यकर्त्या

ख्रिस्ती धर्म प्रेम आणि दया करणे याचा प्रचार करतो.ख्रिस्ती धर्म शत्रूवरही प्रेम करण्यास शिकवतो.कोणत्याही धर्माने द्वेषमूलक प्रचार करणे चुकीचे आहे.

फादर कॉसेसांव डिसिल्वा यांना क्रूर इन्क्विझीशनचा विसर पडला का ? -सावियो रॉड्रिग्स

फादर कॉसेसांव डिसिल्वा वादग्रस्त चलचित्रात म्हणतात,भाजप आता मुलांवर पेट्रोल ओतणार आहे. वास्तविक गोव्यात केवळ क्रूर इन्क्विझीशनच्या वेळी मुले,महिला आणि पुरुष यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले.या वेळी काही फादर आणि बिशप यांनी बलात्कारही केले.फादर कॉसेसांव डिसिल्वा यांना क्रूर इन्क्विझीशनचा विसर पडला का ?

गरळ ओकणार्‍या फादरविषयी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री काही कारवाई करणार कि (नसलेली)मतपेढी जपण्यासाठी गप्प बसणार ? -परिक्षित शेवडे,हिंदुत्वनिष्ठ

गोव्यातील एका चर्चमधला पाद्री (फादर)पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बेधडक अत्यंत गंभीर आरोप करून समोर बसलेल्या भाविकांची दिशाभूल करतो;मात्र प्रसारमाध्यमे चिडीचूप बसतात.हेच एखाद्या हिंदु धर्माचार्याने केले असते,तर चर्चा आणि टीका यांच्या फैरी झडल्या असत्या.धार्मिक कट्टरपंथी म्हणून श्रीरामसेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना तत्कालीन मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात प्रवेशबंदी केली होती.या गरळ ओकणार्‍या पाद्रीविषयी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री काही कारवाई करणार कि (नसलेली)मतपेढी जपण्यासाठी गप्प बसणार ?

फादर डिसिल्वा यांचे वक्तव्य चर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे ! – फादर लोएला परेरा

फादर डिसिल्वा यांचे वक्तव्य चर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे.त्यांच्या या कृतीमुळे चर्च संस्थेची कुचंबणा झालेली आहे.

चर्चच्या व्यासपिठाचा राजकीय वापर अयोग्य ! -मास्कारेन्हास,महासचिव,

गोवन बिशप अँड कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्स चर्च संस्थेच्या व्यासपिठाचा वापर राजकीय प्रचारासाठी करणे हे अयोग्य आणि अस्वीकारार्ह आहे. (असे केवळ फुकाचे बोल नकोत.चर्च संस्थेने कारवाई करून दाखवावी,तरच अशा वक्तव्यांवर विश्‍वास ठेवता येईल.कित्येक फादर अशी आक्षेपार्ह वक्तव्ये करतात.किती जणांवर आतापर्यंत चर्च संस्थेने कारवाई केली ?-संपादक)


Multi Language |Offline reading | PDF