समंजस आणि मितभाषी असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. सुमेध संतोष आटपाडकर (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सुमेध संतोष आटपाडकर एक आहे !

कु. सुमेध आटपाडकर

१. जन्मापूर्वी

१ अ. कुलदेवीच्या दर्शनामुळे बाळाचा जन्म झाल्याची अनुभूती येणे : ‘१०.६.२०१० या दिवशी सुमेधचा जन्म झाला. ‘आम्हाला बाळ होणार नाही’, असे आम्हाला वाटत होते; म्हणून आम्ही वैद्यकीय उपचार चालू करायचे ठरवले. त्याच वेळी आम्हाला एका नातेवाइकांकडून ‘आमची कुलदेवी कुकुटनूरची श्री यल्लमादेवी आहे’, असे समजले. हे आमच्या घरात कोणाला ठाऊक नव्हते. आम्ही लगेच कुलदेवीच्या दर्शनाला गेलो. तेथून परत आल्यावर आम्ही वैद्यकीय उपचारांसाठी आधुनिक वैद्यांकडे जाणार होतो; परंतु मला त्यांच्या औषधोपचारांची आवश्यकता भासली नाही; कारण त्याच मासात मला दिवस राहिले. कुलदेवीच्या दर्शनानेच हे घडले. आम्हाला आलेली ही मोठी अनुभूती होती.

२. गरोदरपण

२ अ. गरोदरपणात नियमितपणे नामजप आणि उपाय करणे : गरोदरपणात मी नियमित नामजप आणि उपाय करत होते. कार्यालयात चाकरीसाठी जातांना मी भ्रमणभाषवर रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र यांचे श्रवण करत होते. मला या नऊ मासांत ‘विशेष आवडीने काही खावे’, असे वाटत नव्हते. मला या दिवसांत विशेष असा त्रासही झाला नाही. अगदी नऊ मासांपर्यंत मी कार्यालयात जात होते. प्रत्येक वेळी ‘कुलदेवीने दिलेला हा प्रसाद आहे’, असा माझा भाव असायचा.’

३. प्रसुतीच्या वेळी

३ अ. त्रास होऊन शस्त्रक्रिया करावी लागणे : ‘मला प्रसूतीच्या वेळी पुष्कळ त्रास झाला. शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे मला अतिशय निराशा आली होती.

३ आ. माझ्या वडिलांना (श्री. आप्पा सांगोलकर यांना) मात्र रुग्णालयात गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.

– सौ. शुभांगी आटपाडकर (कु. सुमेधची आई), मुंबई

४. गुणवैशिष्ट्ये

४ अ. शांत आणि सुस्वभावी : सुमेध लहानपणी पुष्कळ गोंडस होता. सर्व जण त्याच्याकडे आकर्षित व्हायचे; परंतु तो कोणाकडेच जायचा नाही. तो अत्यंत शांत आणि सुस्वभावी आहे. त्याला अडीच वर्षापर्यंत त्याच्या आजोबांनी (परशराम आडपाडकर) सांभाळले होते. त्या वेळी त्याने आजोबांना काहीच त्रास दिला नाही.

४ आ. आज्ञाधारक : तो सांगितलेले सर्व ऐकतो. त्याला ‘नामजप कर’ म्हटल्यावर तो करतो. तो मी सांगितल्याप्रमाणे कृती करतो. तो अतिशय आज्ञाधारक आहे.

४ इ. समजूतदारपणा

१. सुमेध त्याच्या लहान भावाला समजून घेतो आणि सांभाळतो. पाळणाघरात त्याच्यावर लक्षही ठेवतो. तो सहजासहजी उलट उत्तर देत नाही. त्याने घरी किंवा शाळेत काही खोड्या केल्या, तर स्वतःहून मला सांगतो.

२. सुमेध झाल्यापासून आमच्यात (पती-पत्नीमध्ये) कलह वाढले होते. ते त्यालाही जाणवत होते; म्हणून तो मला समजावून सांगायचा, ‘‘आई, मी तुझ्याबरोबर आहे. तू काळजी करू नकोस.’’

– श्री. संतोष आणि सौ. शुभांगी आटपाडकर (सुमेधचे बाबा आणि आई)

३. ‘सुमेध मितभाषी आहे. त्याच्यात लहानपणापासून समंजसपणा अधिक जाणवतो. इतक्या लहान वयातही तो माझ्या मुलीला (मामाच्या मुलीला) दायित्व घेऊन सांभाळतो. सुमेधशी बोलतांना एका आध्यात्मिक विचारसरणीच्या प्रौढ व्यक्तीशी बोलत असल्याचे मला जाणवते.

४. सुमेधला आईची वेगळीच ओढ आहे. त्याला तिची काळजी आणि प्रेम अधिक असल्याचे जाणवते.

४ ई. सात्त्विकता : त्याच्या तोंडवळ्यात वेगळेच चैतन्य आहे. त्याचे डोळे बोलके आहेत.

४ उ. गुरूंविषयी ओढ असणे : सुमेधने अजून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिले नाही, तरीही त्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता जाणवते.’

श्री. नीलेश सांगोलकर (कु. सुमेधचे मामा)

४ ऊ. मंदिरात जाणे अधिक आवडणे : ‘मी सुमेध यास गणपतीच्या मंदिरात घेऊन जात असे. तेथे अधिक वेळ थांबणे त्याला आवडते.

४ ए. कु. सुमेधकडून शिकायला मिळालेला एक प्रसंग : एकदा तो लहान असतांना मी त्याला घेऊन एके ठिकाणी संपर्कास गेलो होतो. ते गृहस्थ वयस्कर होते. ते त्याच्याशी काहीच बोलले नाहीत. तिथून बाहेर पडल्यावर सुमेध मला म्हणाला ‘‘ते आजोबा माझ्याशी काहीच बोलले नाहीत.’’ त्या वेळी ‘मोठ्यांनी लहान मुलांशी कसे वागायला हवे ?’, हे मला त्याच्याकडून शिकायला मिळाले.’

– श्री. आप्पा सांगोलकर (कु. सुमेधचे आजोबा)

५. कु. सुमेधचे स्वभावदोष

१. ‘हट्टीपणा’ – श्री. संतोष आणि सौ. शुभांगी आटपाडकर

२. ‘तो जेवायला अधिक वेळ, म्हणजे जवळजवळ २ घंटे लावतो.’ – श्री आप्पा सांगोलकर

‘भगवंता, तुझ्या कृपेमुळे आम्हाला हे सद्गुणी बाळ लाभले आहे. त्याच्यावर तुझी अखंड कृपादृष्टी राहू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. संतोष आणि सौ. शुभांगी आटपाडकर, मुंबई

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF