समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्याकडून अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील शब्दांत टीका

अशा नेत्यांना निवडणूक लढवण्यास आणि मतदान करण्यास बंदी घालण्यासह कारागृहात डांबले पाहिजे !

नवी देहली – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान उत्तरप्रदेशातील रामपूरमधून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जयाप्रदा उभ्या आहेत. खान यांनी जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील भाषेत टीका केली आहे. यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून राष्ट्रीय महिला आयोगाने याची नोंद घेतली आहे. तसेच त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका केली जात आहे. जयाप्रदा पूर्वी समाजवादी पक्षाच्या नेत्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

१. रामपूरमधील एका सभेत आझम खान यांनी, ‘राजकारण एवढे खालच्या स्तरावर पोचले आहे की, १० वर्षे ज्यांनी रामपूरच्या जनतेचे रक्त प्यायले, ज्यांना बोट पकडून आम्ही रामपूरमध्ये आणले, त्यांनी आमच्यावर नको नको ते आरोप केले. त्यांना तुम्ही मत देणार का ? १० वर्षे ज्यांना प्रतिनिधित्व करायला लावले, त्यांचा खरा तोंडवळा कळायला तुम्हाला १७ वर्षे लागली; पण मी १७ दिवसांत त्यांना ओळखले की, त्यांची ‘अंडरवेअर’ खाकी रंगाची आहे’, असे अश्‍लील शब्द वापरून जयाप्रदा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. (राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरणच आझम खान यांनी दिले आहे ! – संपादक)

या वेळी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही येथे उपस्थित होते. (पक्षाचे नेते अशा प्रकारे खालच्या थराला जाऊन विधाने करत असतांना त्यांना विरोध करण्याऐवजी मूग गिळून गप्प बसणार्‍यांवरही कारवाई करा ! – संपादक)

२. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी खान यांच्यावर ट्वीटद्वारे टीका करतांना पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांना उद्देशून म्हटले की, मुलायम (यादव) भाई, तुम्ही समाजवादी पक्षाचे पितामह आहात. तुमच्यासमोर रामपूरमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात येत आहे. तुम्हीदेखील भीष्मांप्रमाणे शांत रहाण्याची चूक करू नका.’ (सुषमा स्वराज यांनी टीका करतांना हिंदुद्वेषी मुलायमसिंह यादव यांना पितामह भीष्म यांची उपमा देऊन भीष्मांचा अवमानच केला आहे ! – संपादक)

३. यावर आझम खान यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत म्हटले की, माझे विधान चुकीच्या पद्धतीने जनतेला दाखवले जात असून मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. जर मी दोषी आढळलो, तर निवडणुकीतून माघार घेईन. (नाव न घेताही टीका केली जाते आणि तशीच टीका आझम खान यांनी केली आहे, हे स्पष्टच होत आहे ! – संपादक)

४. जयाप्रदा यांनी म्हटले की, मी आझम खान यांना घाबरून रामपूरमधून पळून जाणार नाही. त्यांना पराभूत करूनच ‘मी कोण आहे’ ते दाखवून देईन. त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी. अशी माणसे जर निवडून आली, तर लोकशाहीचे काय होईल ? समाजात महिलांना स्थान उरणार नाही. वर्ष २००९ मध्येदेखील त्यांनी माझ्या विरोधात घाणेरडे वक्तव्य केले होते; मात्र त्या वेळी मला कोणीही साथ दिली नव्हती. (एक नेता सातत्याने अशी विधाने करत असेल आणि त्याच्यावर कारवाई होत नसेल, तर हे लोकशाही निरर्थक असल्याचेच द्योतक आहे ! – संपादक) मी मेल्यावर त्यांना समाधान होणार आहे का ?


Multi Language |Offline reading | PDF