प्रतिदिन दैनिक सनातन प्रभात प्रसिद्ध होतो, अन् जगातील तिमिरात ज्ञानदीप प्रज्वलित होतो !

डिचोली (गोवा) येथे दैनिक सनातन प्रभातच्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीच्या १४ एप्रिल २०१९ या दिवशी झालेल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने…

दैनिक सनातन प्रभातच्या वर्धापनदिनानिमित्त ही काव्यसुमनांजली बुद्धीदाता श्रीगणेश आणि ज्ञानस्वरूप सरस्वतीमाता यांच्या चरणी अर्पण करत आहे.

कु. मधुरा भोसले

प्रतिभा जागृत होते लेख लिहिता लिहिता ।
चित्तशुद्धी होते दैनिक वाचता वाचता ॥ १ ॥

समष्टी साधनेची जणू बहुगुणी प्रेरिता ।
दैनिकातील चैतन्यामुळे होई मनाची शुद्धता ॥ २ ॥

सनातन प्रभातमधील संपादकीय लिखाण ।
म्हणजे शुद्ध मराठी भाषेची जणू शब्दखाण ॥ ३ ॥

हिंदु धर्मानुसार करण्या शुद्ध आचार ।
प्रेरित करतात दैनिकातील संतांचे सुविचार ॥ ४ ॥

कशी वर्णावी सनातन प्रभातची महती ?
भावविभोर करतात साधकांच्या अनुभूती ॥ ५ ॥

सनातन प्रभातमधील साधकांच्या कविता ।
मनशुद्धी करूनी वाढवतात अंतर्मुखता ॥ ६ ॥

‘नोंद’ हे सदर करते विचारांचे मंथन ।
अन् डोळ्यांत घालते झणझणीत अंजन ॥ ७ ॥

साधना करतांना करावे मनाचे निरीक्षण ।
बुद्धीने करावे तयाचे समीक्षण ॥ ८ ॥

धार्मिक विधींचे वाचूनी सूक्ष्म परीक्षण ।
प्रत्येक क्षणी होते भगवंताचे भावस्मरण ॥ ९ ॥

दैनिकातील वाचकांचे परखड विचार ।
घेतात देशद्रोह्यांचा खरपूस समाचार ॥ १० ॥

वाचूनी संशोधनाच्या कार्याचा आढावा ।
बुद्धीचा अडथळा मनातून काढावा ॥ ११ ॥

शिकायला मिळालेल्या सूत्रांचे लेखन ।
मनापासून वाचल्याने होते चिंतन-मनन ॥ १२ ॥

सूक्ष्म ज्ञानाचे भांडार असे दैनिक सनातन प्रभात ।
ज्ञानामृत प्यायल्याने होते चैतन्यदायी सुप्रभात ॥ १३ ॥

राष्ट्र-धर्माशी संबंधित लेखमाला ।
धर्मरक्षणासाठी प्रेरित करतात प्रत्येकाला ॥ १४ ॥

बातमीसह संपादकीय टिपण्यांचा उल्लेख ।
आपल्याला दाखवतो वस्तूस्थितीचा आलेख ॥ १५ ॥

सनातन प्रभात बातम्यांसह दृष्टीकोन देतो ।
आणि प्रत्येकाच्या मनात वैचारिक मंथन घडवतो ॥ १६ ॥

धर्मशिक्षणा संदर्भातील मजकूर रोज प्रसिद्ध होतो ।
अन् विश्वातील तिमिरात ज्ञानदीप प्रज्वलित होतो ॥ १७ ॥

संपादकीय लिखाण आणि नोंद यांच्या माध्यमातून ।
राष्ट्रधर्मप्रेम जोपासले जाते कृतीतून ॥ १८ ॥

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधातून ।
अध्यात्माचे महत्त्व कळते वैज्ञानिक प्रयोगांतून ॥ १९ ॥

सनातन प्रभात प्रतिदिन प्रसिद्ध होतो ।
अन् स्थुलासह सूक्ष्मातूनही कार्यरत असतो ॥ २० ॥

दैनिक सर्वत्र चैतन्य प्रसारित करते ।
आणि आत्मचैतन्यावरील आवरण दूर करतो ॥ २१ ॥

दैनिक मृतवत हिंदूमध्ये धर्मतेज जागवते ।
आणि जन्महिंदु वाचकांना कर्महिंदु बनवते ॥ २२ ॥
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF