प्रथम चित्रपट पहा, त्यावर निर्णय घ्या आणि त्याचा अभिप्राय कळवा ! – सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

पंतप्रधान मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाचे प्रकरण

निवडणूक आयोग चित्रपट न पहाताच त्याच्यावर बंदी कशी घालतो ? तो उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न करतो का ?

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम् नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर बंदी आणावी कि नाही, हे चित्रपट पाहून ठरवा आणि त्याचा अभिप्राय २२ एप्रिलपर्यंत बंद लिफाफ्यात सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. हा चित्रपट ११ एप्रिल या दिवशी प्रदर्शित होणार होता; मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. त्याच्या विरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ‘निवडणूक आयोगाने चित्रपट न पहाताच निर्णय घेतला’, अशी बाजू निर्मात्यांनी न्यायालयात मांडली होती.


Multi Language |Offline reading | PDF