योगी आदित्यनाथ यांना ३, तर मायावती यांना २ दिवस प्रचार करण्यास बंदी 

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यावरून निवडणूक आयोगाची कारवाई

नवी देहली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. योगी आदित्यनाथ यांना ३ दिवस, तर मायवती यांना २ दिवस प्रचार करण्यास बंदी घातली आहे. या दोघांनी प्रचाराच्या वेळी आक्षेपार्ह विधाने केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF