दिव्यांग तरुणीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या ५ जणांना कारावासाची शिक्षा

विलंबाने मिळालेला न्याय, हा न्याय असेल का ?

ठाणे, १५ एप्रिल (वार्ता.) – येथील लोकमान्यनगर परिसरात जेवणाचा डबा आणण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय मानसिक दिव्यांग तरुणीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या पाच जणांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तब्बल १७ साक्षीदार तपासून हा निकाल ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस्.ए. सिन्हा यांनी १२ एप्रिल या दिवशी दिला. यातील नरोजी खरात, राजेश लालचंद मौर्या, कमलेश उपाख्य पिंटू गुप्ता आणि विजय बहादुर कमलाप्रसाद गुप्ता या चार आरोपींना २० वर्षे, तर सर्वप्रथम घरात बोलावून अत्याचार करणार्‍या गोपी बोरा या पीडितेच्या बहिणीच्या शेजार्‍याला १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ८ जानेवारी २०१६ या दिवशी घडली होती.


Multi Language |Offline reading | PDF