उर्मिला मातोंडकर यांच्याविरुद्ध उल्हासनगरमध्ये गुन्हा नोंद

उल्हासनगर- लोकसभा निवडणुकीतील उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी एका कार्यक्रमात हिंदूंविषयी अपशब्द काढले. त्यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली. याविषयी येथील अधिवक्त्या राखी बारोडे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मातोंडकर यांच्या विरोधात तक्रार करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. ‘हिंदु धर्म हा सर्वांत हिंसक धर्म आहे’, असे वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी केले होते.

या प्रकरणी १३ एप्रिलला गुन्हा नोंद केल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे यांनी दिली. काँग्रेस शहराध्यक्ष राधाचरण करोतीय यांनी हा विरोधी पक्षाचा ‘निवडणूक स्टंट’ असल्याचा आरोप केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF