सत्यान्वेषी, निर्भीड, वस्तूनिष्ठ पत्रकारितेचा आदर्श असलेल्या आणि साधनेविषयी मार्गदर्शन करून व्यक्तीत अंतर्बाह्य पालट घडवणार्‍या ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांचे कौतुकोद्गार !

‘वाचकवृद्धी मोहिमे’च्या निमित्ताने…

‘पत्रकारितेचा पुढील आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ‘सनातन प्रभात’ कार्यरत आहे,

‘कीं घेतले व्रत न हें अम्हिं अंधतेने ।
बुद्ध्याचि वाण धरिले करिं हे सतीचे ॥’

– स्वातंत्र्यवीर सावरकर

‘सनातन प्रभात’ म्हणजे वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवर अचूक मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच ! २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी जनकल्याणाची अनेक उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राची निर्मिती केली. दिशाहीन समाजाला दिशा मिळावी, राजकारणी व्यक्तींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, जनतेच्या मनात राष्ट्र आणि स्वधर्म यांच्याप्रती प्रेम निर्माण व्हावे, तसेच साधकांना साधनेविषयी प्रतिदिन मार्गदर्शन मिळावे आदी हेतूंनी आर्थिक हानी सोसूनही हे वृत्तपत्र चालू केले. परात्पर गुरु डॉक्टरांनी ज्या उदात्त हेतूंनी ‘सनातन प्रभात’ चालू केले, त्यांतील बहुतांश उद्देश आज सफल होतांना दिसत आहेत. आज ‘सनातन प्रभात’चा विशिष्ट वाचक वर्ग निर्माण झाला आहे. ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने त्यांचे विचार आणि कृती यांत आमूलाग्र पालट होत आहेत अन् हेच सनातनचे यश आहे.   

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

ठिकठिकाणच्या वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढलेलेे कौतुकोद्गार पुढे दिले आहेत. त्यावरून ‘सनातन प्रभात’चे महत्त्व आणि वाचकांची नियतकालिकावरील विश्‍वासार्हता लक्षात येते.

माझ्या धर्मावर आलेल्या संकटांची मला जाणीव झाली आहे. आता मीही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वतोपरी कृती करणार आहे !

दिनांक १५ एप्रिलच्या अंकात आपण अंकवाचनामुळे वाचकांना व्यक्तीगत स्तरावर झालेले लाभ आणि त्यांच्यात झालेले शारीरिक अन् मानसिक स्तरांवरील पालट पाहिले आज आपण त्यापुढील भाग पहाणार आहोत.

४. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांची उल्लेखनीय कृतीशीलता !

४ अ. जिज्ञासूंना वाचक होण्यास प्रवृत्त करणारे, तसेच अयोग्य वक्तव्ये करणार्‍यांचे खंडण करणारे लातूर येथील एक अधिवक्ता !

‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचतो आणि त्यातील सूत्रे इतरांनाही सांगतो. जिज्ञासूंना वाचक होण्यास मी प्रवृत्त करतो. सनातन संस्था, तसेच ‘सनातन प्रभात’ यांच्याविषयी कुणी अयोग्य बोलत असेल, तर मी लगेचच परखडपणे त्याचे खंडण करतो. मला या नियतकालिकाप्रती आदर आहे.’ (नोव्हेंबर २०१७)

४ आ. श्री. चंद्रकांत वैती, संभाजीनगर

‘मुळात मला वाचनाची आवड नव्हती; परंतु ‘सनातन प्रभात’मुळे ती निर्माण झाली. मी जेथे जातो, तेथे जिज्ञासूंसाठी ‘सनातन प्रभात’ चालू करतो.’ (नोव्हेंबर २०१७)

४ इ. सौ. ज्योती जोशी, संभाजीनगर

‘मी एका शाळेत शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होण्यासाठी मी त्यांना ‘सनातन प्रभात’ वाचायला देते.’ (नोव्हेंबर २०१७)

४ ई. परिचितांना स्वखर्चाने अंक चालू करणारे एक वाचक !

एका गावातील वाचकाने त्यांच्या परिचयातील २ व्यक्तींची नावे सांगितली. स्थानिक साधकांनी ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवण्यासाठी त्यांना संपर्क केला; पण तो झाला नाही. याविषयी त्या वाचकांना समजल्यावर त्यांनी दोन्ही परिचितांच्या अंकांचे अर्पणमूल्य (वर्गणीची रक्कम) स्वतः भरले आणि त्यांना अंक चालू करण्यास सांगितले. (जानेवारी २०१८)

‘तुम्ही माझ्या वतीने कोणत्याही २ – ३ जिज्ञासूंना ‘सनातन प्रभात’ चालू करा’, असेही काही वाचक सांगतात.

४ उ. चिकित्सालयात ‘सनातन प्रभात’ ठेवणार्‍या नौपाडा (ठाणे) येथील डॉ. (सौ.) संघवी समीर पाटील !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्यावर ‘सण धर्मशास्त्रानुसार आणि भावपूर्ण कसे साजरे करावेत ?’, याविषयी माहिती कळते आणि त्याप्रमाणे कृती करता येते. मी डॉक्टर असून माझ्या चिकित्सालयात दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ठेवते. त्यामुळे रुग्णांना दैनिकाचे वाचन करता येते. ‘या अंकातील माहिती पुष्कळ छान असते.’ (फेब्रुवारी २०१८)

संकलक : (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०१९)
(क्रमश:)


Multi Language |Offline reading | PDF