मुले भ्रमणभाषवर काय खेळतात, हे पहाण्याचे सर्वस्वी दायित्व पालकांचे ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – पालकच आपल्या मुलांना आयफोनसारखे महागडे फोन विकत घेऊन देतात. त्यामुळे ‘पबजी’सारखे हिंसक खेळ खेळण्यास मुले उद्युक्त होतात. कोणतीच शाळा पबजी किंवा इतर खेळ भ्रमणभाषवर खेळण्याची शाळेत अनुमती देत नाही. म्हणूनच आपली मुले घरी किंवा घराबाहेर भ्रमणभाषवर काय खेळतात याकडे लक्ष देण्याचे सर्वस्वी दायित्व हे पालकांचे असते. पालकांनी भ्रमणभाष ‘पासवर्ड’ टाकून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे; जेणेकरून लहान मुले त्यांच्या नकळत फोन वापरू शकणार नाहीत. आम्हीही एक पालक आहोत. आमची मुले भ्रमणभाषवर काय करतात, याकडे आमचेही लक्ष असते, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले.

लहान मुलेच नव्हे, तर मोठ्यांनाही घंटोनघंटे भ्रमणभाषवर खिळवून ठेवणार्‍या ‘पबजी’ या ऑनलाइन गेमवर बंदी घाला, अशी मागणी करत ११ वर्षांच्या अहमद निझाम या विद्यार्थ्याने आपल्या आईद्वारे उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. पबजी या भ्रमणभाष खेळामुळे हिंसाचार वाढत असून सायबर गुन्हेगारीलाही प्रोत्साहन मिळत आहे. विद्यार्थी शाळेतही हा खेळ खेळत आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या खेळावर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे केली. या वेळी उच्च न्यायालयानेे तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत याचिकाकर्त्यांनाच फटकारले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now