भारताची लोकसंख्या १३६ कोटी ! – संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी

  • प्रतिवर्षी लोकसंख्या वाढीत भारत चीनच्याही दुपटीने पुढे !
  • लोकसंख्येत भारत आता चीनपेक्षा केवळ ६ कोटींनीच मागे !
  • भारतात कोणाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हे सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकगठ्ठा मतांसाठी एकाही राजकीय पक्षाने धर्मांधांच्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचाच हा परिपाक आहे !

संयुक्त राष्ट्रे – संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोषाच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या वर्ष २०१० ते २०१९ या कालावधीत सरासरी प्रत्येक वर्षी १.२ टक्के वाढून ती आता १३६ कोटी झाली आहे. ही टक्केवारी चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दुप्पट आहे. चीनची ०.५ टक्क्याने प्रतिवर्षी लोकसंख्या वाढ झाली. चीनची लोकसंख्या आता १४२ कोटी इतकी झाली आहे. लोकसंख्येत भारत आता चीनपेक्षा केवळ ६ कोटींनीच मागे आहे. वर्ष १९९४ मध्ये भारताची लोकसंख्या ९४ कोटी २२ लाख इतकी होती, तर तेव्हा चीनची १२३ कोटी होती. याशिवाय सध्या जगाची लोकसंख्या ७७१ कोटी ५० लाख इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ती ७६३ कोटी ३० लाख होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now