तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याच्या वापरात भारत चीनच्या पुढे !

भारत लोकसंख्या वाढीच्या दरामध्येही चीनच्या पुढे गेला आहे, हेही लक्षात घ्या !

नवी देहली – तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याच्या उपयुक्ततेमध्ये भारताच्या विकासाचा वेग हा चीनहून दुप्पट आहे. वर्ष २०१४ पासून ते आतापर्यंत भारताने ९० टक्के विकास केला असून चीन मात्र अद्याप ४५ टक्क्यांंवरच आहे. प्रतिदिनच्या जगण्यातील तंत्रज्ञानाच्या वापराच्या संदर्भातही भारताने रशिया आणि जर्मनी या दोन्ही देशांना पिछाडीवर टाकले आहे, अशी माहिती ‘मॅकेंझी’च्या ‘डिजीटल इंडिया-टेक्नॉलॉजी टू ट्रान्सफॉर्म अ कनेक्टेड नेशन’ नावाच्या अहवालात दिली आहे.

१. या अहवालानुसार, वर्ष २०१४ मध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २३ कोटी ९० लाख इतकी होती. ती संख्या वर्ष २०१८ मध्ये दुपटीने वाढून ५६ कोटी इतकी झाली आहे.

२. वर्ष २०१४ मध्ये एक व्यक्ती वर्षाकाठी २.२ टक्के इतकाच ‘कॅशलेस’ व्यवहार करत असे. ही संख्या वर्ष २०१८ मध्ये १८ टक्के इतकी झाली आहे. तसेच स्मार्टफोन वापरणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाली असून त्यानुसार डेटाची मागणीही वाढतांना दिसत आहे.

३. गेल्या ३ वर्षांमध्ये इंटरनेट डेटा स्वस्त झाल्यामुळे डेटा विक्री जवळपास १०० टक्क्यांनी वाढली आहे. ऑनलाइन व्यापारही वाढला असून सध्या भारतात १७ कोटी ६० लाख इतके इ-कॉमर्स वापरकर्ते आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now