नाशिक येथे महाविद्यालयाच्या परिसरात ‘आयपीएल्’ क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजी उघड

महाविद्यालयीन युवकांनी क्रिकेट या इंग्रजी खेळाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीच्या मार्गाला लागणे, हा त्यांना धर्मशिक्षण नसल्याचाच परिणाम आहे. मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीमुळेच युवकांना धर्मशिक्षण मिळत नाही, हे ही तितकेच खरे !

नाशिक – सध्या चालू असलेल्या ‘आयपीएल्’ क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी चालू असल्याची माहिती नाशिक शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका महाविद्यालयाच्या परिसरात सट्टा खेळला जात असलेल्या अड्ड्यावर धाड टाकून ३ संशयितांसह ६५ सहस्र ७०० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

‘आयपीएल्’ स्पर्धेच्या निमित्ताने विविध शहरांमध्ये सट्टेबाज सक्रीय झाले असून यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अडकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरील कारवाई करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF