(म्हणे) ‘आदिवासी, मागासवर्गीय आणि मुसलमान यांच्यासाठी काम करणार्‍या धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मते द्या !’

चर्च संघटनेकडून तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील ख्रिस्ती मतदारांना आवाहन

  • अशा प्रकारे जाती आणि धर्म यांच्यासाठी संकुचित विचाराने मत देण्याचे राज्यघटनेविरोधी आवाहन करणार्‍या चर्च संघटनेवर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे आणि यासाठी हिंदूंच्या संघटनांनी तक्रार केली पाहिजे !
  • ‘जाती आणि हिंदु सोडून विशिष्ट धर्म यांच्यासाठी काम करणारे म्हणे धर्मनिरपेक्ष’, अशी धर्मनिरपेक्षतेची नवीन व्याख्या आता करावी लागेल !
  • एखाद्या हिंदु संघटनेने ‘हिंदूंसाठी काम करणार्‍यांना मते द्या’, असे आवाहन केले असते, तर एकजात सर्व राजकीय पक्षांनी तिच्या विरोधात तक्रारी केल्या असत्या, हे लक्षात घ्या !
  • पाकिस्तानात ख्रिस्त्यांवर धर्मांध मुसलमानांकडून होणारे अत्याचार ख्रिस्ती संघटनांना ठाऊक नाहीत का ?

भाग्यनगर – तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील बिशप अन् चर्च यांची संस्था असणार्‍या ‘फेडरेशन ऑफ तेलुगू चर्चेसने’ (एफटीसीने) ख्रिस्ती नागरिकांना कोणत्याही एका राजकीय पक्षापासून आणि त्यांच्या प्रचारापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आदिवासी, मागासवर्गीय आणि मुसलमान यांच्यासाठी काम करणार्‍या धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मत देण्याचे आवाहन केले आहे. या व्यतिरिक्त शेतकरी, महिला आणि मुले यांच्यासाठी काही तरी करण्याचे ज्यांचे प्राधान्य आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी कृती करण्याचे ज्यांनी आश्‍वासन दिले आहे, अशांना मत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्याचाही आदेश दिला आहे.

फेडरेशनकडून प्रसारित करण्यात आलेल्या पत्रामध्ये बिशप टी. राजा राव, व्ही. प्रसाद राव आणि फादर एंटनीराज थुम्मा यांनी वरील आवाहन केले आहे. (बाटग्यांनी अन्य हिंदूंची फसवणूक करण्यासाठीच त्यांची मूळ हिंदू नावे तशीच ठेवली आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF