जपानमधील कॅथलिक चर्चच्या पाद्रयांकडून झालेल्या लैंगिक शोषणाचीही चौकशी होणार

  • पाद्रयांकडून लहान मुलांच्या होणार्‍या लैंगिक शोषणाचे लोण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया यानंतर आता जपानपर्यंतही पोचले आहे; मात्र भारतातील प्रसारमाध्यमे, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी याविषयी जाणीवपूर्वक मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
  • एकंदरीत सद्यस्थिती पहाता ख्रिस्ती चर्च म्हणजे ‘लैंगिक शोषणाचे केंद्र’ आणि पाद्री म्हणजे ‘वासनांध व्यक्ती’ असेच चित्र आता जगभरातील समाजात निर्माण झाले आहे, असे दिसून येते !

टोकीयो (जपान) – जपानमधील कॅथलिक चर्चमधील पाद्रयांकडून झालेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोेषणाच्या प्रकरणांची चौकशी करण्याची सिद्धता येथील कॅथलिक चर्चकडून करण्यात येत आहे. यात २० वर्षांपूर्वीच्या या संदर्भातील आरोपांचीही चौकशी होऊ शकते. (इतक्या वर्षांपासून जपानमध्ये असे प्रकार चालू असतांना त्याची अद्यापही चौकशी न होणे, हे चर्चला लज्जास्पद ! अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्यावरून चर्चवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

जपानमध्ये ११ एप्रिलला झालेल्या कॅथलिक बिशप संमेलनात सांगण्यात आले की, चर्चने प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन केली आहे. ही समिती पाद्रयांकडून झालेल्या लैंगिक शोषणाची चौकशी करील. पोप फ्रान्सिस यांनी याच वर्षी फेब्रुवारी मासामध्ये व्हॅटिकनमध्ये याच विषयावर बिशप संमेलन आयोजित केले होते.


Multi Language |Offline reading | PDF