दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

दैनिक सनातन प्रभातच्या द्विदशकीय द्वितीय विशेषांकाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. रमेश नाईक, श्री. कमलेश बांदेकर, श्री. अरविंद पानसरे आणि श्री. सत्यविजय नाईक

डिचोली, १४ एप्रिल (वार्ता.) – हिंदूंवरील अत्याचार, धर्मांधांच्या कारवाया, सामाजिक भ्रष्टाचार, शासनकर्त्यांचा पक्षपातीपणा यांसारख्या अनेक विषयांवर जागृती करणारा, ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून प्रखरपणे हिंदूजागृतीचे कार्य करणारा, न डगमगता अगदी सडेतोड विचार मांडणारा आणि अनेक संतांचा आशीर्वाद लाभलेला अशी ‘सनातन प्रभात’ची ख्याती आहे. आगामी आपत्काळाविषयी वाचकांना सतर्क करणे, आपत्काळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी उपाययोजना सांगणे आणि अधिकाधिक जणांचे जीवितरक्षण करणे, हीच दैनिक ‘सनातन प्रभात’च्या आगामी कार्याची दिशा आहे. अशा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा डिचोली येथील दिनदयाळ भवन येथे

१४ एप्रिल या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील पत्रकारितेची द्विदशकी वाटचाल करणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थिती लावून किंवा आयोजकांशी संपर्क साधून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ‘भारत स्वाभिमान’चे श्री. कमलेश बांदेकर आणि शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, तसेच ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांची वक्ते या नात्याने उपस्थिती होती.

सोहळ्याला शंखनाद करून, तसेच सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब आणि व्यासपिठावरील अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. यानंतर व्यासपिठावरील वक्ते आणि उपस्थित संत यांचा सन्मान करण्यात आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now