डोंबिवली येथील सनातनचे साधक अजय संभूस आणि संदीप अग्निहोत्री यांची पोलीस हवालदार बाबरे यांच्याकडून चौकशी !

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी हिंदुद्वेषी पोलिसांनी सनातनच्या साधकांच्या मागे लावलेला चौकशीचा ससेमिरा !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणार्‍या सनातनच्या निरपराध साधकांची वारंवार चौकशी करून त्यांना नाहक छळणारे पोलीस कायद्याचे राज्य काय देणार ? अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

‘कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी डोंबिवली येथील सनातनचे साधक श्री. अजय संभूस आणि श्री. संदीप अग्निहोत्री यांची ११ एप्रिल २०१९ ला रात्री ९ वाजता त्यांच्या घरी जाऊन पोलीस हवालदार बाबरे यांनी चौकशी केली.

हवालदार बाबरे यांच्याकडे असलेल्या चौकशीच्या आदेशाच्या पत्रामध्ये ‘सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोघे पसार आहेत. त्यांच्यावर गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संशय आहे. तरी सनातनचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे त्यांची चौकशी करावी’, असे नमूद करण्यात आले होते. त्यापुढे चौकशीसाठी काही साधकांची नावे होती.

चौकशीसाठी आलेल्या पोलिसांनी श्री. अजय संभूस यांना ‘गोविंद पानसरे यांच्या हत्येविषयी तुम्हाला काही ठाऊक आहे का ?’, असे विचारले. श्री. संभूस यांनी काही ठाऊक नसल्याचे सांगितल्यावर हवालदार बाबरे यांनी ‘भविष्यात काही समजल्यास कळवा’, असे सांगितले. त्यानंतर हवालदार बाबरे यांनी श्री. अजय संभूस यांचा लिखित जबाब घेतांना नाव, पत्ता, वय, व्यवसाय, ‘घरी कोण असते ?’, ‘सध्या सनातन संस्थेचे कोणते कार्य करता ?’ याविषयी माहिती लिहून त्याखाली श्री. संभूस यांची स्वाक्षरी घेतली.

या वेळी बाबरे यांनी श्री. संभूस यांना ठाणे येथील सनातनच्या साधकांचे पत्ते विचारले; मात्र श्री. अजय संभूस यांनी ‘प्रकृती बरी नसल्यामुळे सध्या मी घराबाहेर जास्त पडत नाही’, असे सांगितले.

श्री. संदीप अग्निहोत्री यांचीही अशाच प्रकारे पोलिसांनी चौकशी केली.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now