‘मला मतदान करा, नाहीतर शाप देईन’ असे म्हणणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद

साक्षी महाराज यांच्या शापाचा खरेच परिणाम होणार असेल, तर ते देशद्रोही, धर्मांध, भ्रष्टाचारी आणि हिंदुद्वेषी यांना शाप का देत नाहीत ?

नवी देहली – मी एक संन्यासी आहे. मतांची भीक मागण्यासाठी तुमच्या दारापर्यंत आलो आहे. जर एका संन्यासाला तुम्ही मतदान केले नाही, तर तुमच्या घरातून मी पुण्य घेऊन जाईन आणि तुम्हाला शाप देऊन जाईन, असे विधान उत्तरप्रदेशातील उन्नाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार साक्षी महाराज यांनी उन्नाव येथील एका सभेत केले. या विधानावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साक्षी महाराज यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी याआधीही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF