दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात द्विदशकपूर्ती वर्धापनदिन विशेषांकाचे भावपूर्ण वातावरणात पूजन !

पूजन करण्यात आलेला द्विदशकपूर्ती वर्धापनदिन विशेषांक
वर्धापनदिन विशेषांकाचे पूजन करतांना श्री. चैतन्य दिक्षित

रामनाथी – दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीला २० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ १४ एप्रिल या दिवशी प्रकाशित करण्यात आलेल्या द्विदशकपूर्ती वर्धापनदिन विशेषांकाचे येथील कार्यालयात भावपूर्ण पूजन करण्यात आले. सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. चैतन्य दीक्षित यांनी हे पूजन केले. त्यानंतर सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांनी दैनिकाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विद्यमान समूह संपादक ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. नागेश गाडे यांच्यासह सनातन प्रभातची सेवा करणार्‍या सर्व साधकांनी भावपूर्ण नमस्कार केला. या वेळी सनातन प्रभातची सेवा करतांना साधनेच्या स्तरावर झालेल्या चुकांसाठी श्री सरस्वतीदेवीच्या चरणी क्षमायाचना करण्यात आली. दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होता येत असल्याविषयी आणि साधना होत असल्याविषयी उपस्थित साधकांनी मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली.

वर्ष १९९९ मध्ये पहिला अंक प्रकाशित झाला तेव्हा आणि नंतर प्रत्येक वर्धापनदिनी असे २१ वेळा दैनिकाच्या अंकाचे पूजन करून दैनिकाचे पूजन करण्याची सनातन प्रभातची परंपरा अखंडित आहे.


Multi Language |Offline reading | PDF