गुरुदेवांच्या कृपेमुळे श्रीमती निलीमा नाईक यांना आलेली अनुभूती

अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘मनात आलेला प्रत्येक शब्द गुरुदेवांपर्यंत पोचतो’, हे अनुभवतांना मनाला विसावा मिळणे

‘गुरुदेवा, मी १८.११.२०१८ या दिवशी ‘चिंतन’ हा भाग लिहित होते. तेव्हा मी ‘माझ्या साधनेतील अडथळा मीच आहे’, असे लिहिले. दुसर्‍या दिवशी सकाळी मी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी दैनिकांत लिहिलेली चौकट वाचली आणि मला पुष्कळ आनंद झाला; कारण देवालाही मला तेच सांगायचे होते. गुरुदेवा, आपल्या कृपेनेच मी जिवंत आहे. माझ्या मनात आलेला प्रत्येक शब्द आपल्यापर्यंत पोचतो आणि तो मी अनुभवते. तेव्हा माझ्या मनाला विसावा मिळतोे.

२. गुरुदेवांनी साधिकेत जिवंतपणा आणला, याची जाणीव तिला वझेगुरुजींच्या बोलण्यातून होणे

२०.११.२०१८ या दिवशी यज्ञ चालू होता. त्या वेळी मी सभागृहात बसले होते. तेव्हा मला वाटत होते, ‘मी एक रुईचे झाड आहे. त्याची पाने बाहेरून मोठी मोठी दिसतात; पण आतून ती सुकल्यासारखी दिसतात. मी आश्रमात आल्यापासून ‘या झाडाला थोडी पालवी फुटण्याची चिन्हे दिसत आहेत’, (‘मी असा विचार करायला नको होता’, असे मला तेव्हा वाटले.) असे मी अनुभवत असतांना श्री. दामोदर वझेगुरुजींनी सांगितले, ‘‘श्री हनुमानाच्या मूर्तीत जिवंतपणा आला आहे.’’ हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि ‘प.पू. गुरुदेवांनी तसाच जिवंतपणा माझ्यात आणला आहे’, हे माझ्या लक्षात आले.

गुरुदेवा, हे तुम्ही मला अनुभवायला दिलेत, यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’

 – श्रीमती निलिमा नाईक, फोंडा, गोवा. (१४.१.२०१९)

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now