५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील कु. सुयश सचिन पवार (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सुयश पवार हा एक आहे !

कु. सुयश पवार याला सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

कु. सुयश पवार

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

१. गायत्री मंत्र लावल्यावर लगेच झोपणे आणि बोलायला लागल्यावर प्रथम गायत्री मंत्र पाठ होणे

‘सुयश सहा मासांचा असतांना पुष्कळ वेळ जागा असे. त्याला पटकन झोप लागत नसे. त्या वेळी गायत्री मंत्र लावल्यावर तो लगेच झोपत असे, तसेच तो बोलायला लागल्यावर त्याचा प्रथम गायत्री मंत्र लगेच पाठ झाला.

२. शांत आणि सहनशील

सुयशच्या जन्मपत्रिकेत मूळ शांतीविधी करण्यास सांगितला होता. सुयश एक वर्षाचा असतांना आम्ही तो विधी केला. विधी पूर्ण होईपर्यंत सुयश आमच्या मांडीवर बसून शांतपणे यज्ञात तुपाची आहुती देत होता. त्या वेळी धूर किंवा उष्णता यांचा त्रास त्याच्या तोंडवळ्यावर जाणवत नव्हता.

३. मुक्या प्राण्यांविषयीचा प्रेमभाव

त्याला मुक्या प्राण्यांविषयी पुष्कळ प्रेम आहे. त्यांना कोणी त्रास दिलेला त्याला आवडत नाही. ‘दारात गाय येत आहे’, असे दिसताच लगेच तो घरातून भाकरी किंवा पोळी घेऊन येतो.

४. इतरांना साहाय्य करणे

त्याला घर स्वच्छ ठेवायला आवडते. कोणी काही काम करत असेल, तर तो ‘तुम्हाला साहाय्य करू का ?’, असे विचारतो. तो घरकामात आईला साहाय्य करतो आणि दुकानातून छोट्या वस्तू आणून देतो.’

– श्री. सचिन आणि सौ. स्वरांजली सचिन पवार (आई-वडील), बार्शी, जिल्हा सोलापूर. (२०.६.२०१८)

५. ऐकण्याची वृत्ती

‘तो खेळत असतांना त्याला काही सेवा सांगितली, तरी तो पटकन करतो.’ – श्री. प्रभाकर पवार (आजोबा), बार्शी, जिल्हा सोलापूर. (१४.६.२०१८)

६. त्याला देवता आणि महापुरुष यांच्या गोष्टी ऐकायला आवडते.’ – श्री. सचिन आणि सौ. स्वरांजली सचिन पवार

७. सेवेची आवड

‘वर्ष २०१५ मध्ये माझ्याकडे सोलापूरच्या गुरुपौर्णिमा अर्पण पावती पुस्तकांच्या अहवालाची सेवा होती. तेव्हा साधकांकडून जमा झालेली पावतीपुस्तके पडताळून त्यावरील पेन्सिलच्या खुणा खोडत होतो. त्या वेळी सुयश मला म्हणाला, ‘‘आबा, मला परमपूज्यांची ही सेवा करू द्या ना ! मी पेन्सिलच्या खुणा खोडतो.’’ त्याने ती सेवा शिकून घेतली. त्याने प्रत्येक रात्री ती सेवा केली, तसेच ती पुस्तके क्रमाने लावून पिशवीत भरून ठेवली.

८. गुरुपौणिमेला आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभेला जाण्याची तळमळ

तो सोलापूरच्या गुरुपौर्णिमेला आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभेला जातो. आई-बाबांना सभेला येण्यासाठी हट्टाने तयार करतो आणि तेथे जातो. सभेत वक्त्यांनी जी सूत्रे सांगितली, ती लक्षात ठेवून तो त्याविषयी बाबांसमवेत चर्चा करतो.

९. आश्रमात जाण्याची ओढ

‘आबा, मलाही तुमच्या समवेत आश्रमात यायचे आहे’, असे तो तळमळीने सांगतो.

१०. आध्यात्मिक उपाय करणे

तो अत्तर, कापूर आणि उदबत्ती यांचे उपाय (अनियमित) करतो. मी घरी असल्यावर तो मलाही उपायांची आठवण करून देतो.

११. परमपूज्यांवर श्रद्धा

वर्ष २०१६ मध्ये तो भावाच्या समवेत खेळत होता. तेव्हा पळतांना त्याच्या डोळ्यांवर जोरात धडक बसली आणि संपूर्ण डोळा सुजून तो पूर्ण झाकला गेला, तरी तो रडला नाही. तो म्हणाला, ‘‘परमपूज्य माझा डोळा नीट करतील.’’

१२. स्वभावदोष

स्वतःच्या वस्तू इतरांना न देणे, हट्टीपणा, मनातली गोष्ट मनात ठेवणे, आईचे कधी कधी न ऐकणे, चिडचिड करणे, अभ्यासाचा आळस करणे, सर्व मुलांच्या समवेत खेळत असतांना कधी कधी मनाविरुद्ध झाल्यावर चिडचिड किंवा भांडण करणे.’

– श्री. प्रभाकर पवार (१४.६.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF