‘चौकीदारा’प्रमाणेच नावापुढे ‘मुजाहिद’ शब्द (धर्मयोद्धा) लावा ! 

श्रीनगरचे उपमहापौर शेख इमरान यांचे त्यांच्या समर्थकांना आवाहन

कुठे मुसलमान नेते थेट धर्माच्या आधारे समर्थकांना आवाहन करतात, तर कुठे भाजप ‘चौकीदार’ शब्दाद्वारे धर्मनिरपेक्षता दाखवण्याचा प्रयत्न करतो !

श्रीनगर – श्रीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर शेख इमरान यांनी ‘मीही चौकीदार’ या भाजपच्या नेत्यांच्या सामाजिक माध्यमांतील अकाऊंटच्या नावापुढे लावण्यात आलेल्या शब्दांप्रमाणे स्वतःच्या नावापुढे ‘मुजाहिद’ (पवित्र युद्धासाठी (जिहादसाठी) लढणारा धर्मयोद्धा) असा शब्द लावला आहे आणि त्यांनी त्यांच्या समर्थकांनाही लावण्याचे आवाहन केले आहे.

शेख इमरान यांनी म्हटले की,

१. मुजाहिद’ शब्दाचा अर्थ ‘धर्मयोद्धा’ आहे. ‘मुजाहिद’ शब्द लिहून यात सहभागी होणारा वाईटाचा विरोध करून चांगल्याचे समर्थन करणारा रक्षक आहे. सर्व मुसलमानांनी ‘मुजाहिद’ व्हायला हवे. या शब्दाचा वापर करण्यात काहीही हानी नाही.

२. ‘जिहाद’ शत्रूच्या विरोधातील एक आध्यात्मिक लढाई आहे. प्रसारमाध्यमांतील काही लोकांनी आमच्या धर्माची चुकीची व्याख्या केली आहे. प्रसारमाध्यमे ‘मुजाहिद’ नावाच्या शब्दाचा नकारात्मक पद्धतीने वापर करतात. (प्रसारमाध्यमांवर टीका करणारे शेख इमरान आतंकवाद्यांकडून या शब्दाचा वापर केला जातो, त्याचा विरोध का करत नाहीत ? – संपादक)

३. इस्लाम शांतीचा धर्म आहे. तसेच यात इस्लामला हानी पोचवणार्‍यांशी युद्ध करण्यासही सांगितले आहे. (इस्लामला कोण हानी पोचवत आहे, हे शेख इमरान यांनी सांगायला हवे ! इतिहास आणि वर्तमान याउलट आहे. इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर झाला आहे, हा इतिहास आहे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now