माहिती आणि तंत्रज्ञान आस्थापनाने ७ कोटी ८० लाख लोकांचा आधार कार्डचा डेटा चोरला

भाग्यनगर – युआयडीएआयने (युनिक आयडेटिंफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने) दिलेल्या तक्रारीनंतर येथील सायबराबाद पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान आस्थापन ‘आयटी ग्रिड्स (इंडिया)’च्या विरोधात तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील ७ कोटी ८० लाखांहून अधिक लोकांच्या आधार कार्डची माहिती अवैधरित्या स्वतःकडे ठेवल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. हे आस्थापन आधार कार्डचा हा डेटा तेलगू देसम् पक्षाचे ‘सेवा मित्र’ नावाचे ‘अ‍ॅप’ बनवण्यासाठी वापरत होते. याविषयी तेलगू देसमने यावर स्पष्टीकरण देतांना सांगितले की, आधार कार्डाच्या डेटाची कच्ची माहिती आमच्याकडे नाही.


Multi Language |Offline reading | PDF