बेळगाव येथील सनातनचे साधक श्री. संभाजी चव्हाण यांना रामनाथी आश्रमात आल्यानंतर जाणवलेली सूत्रे

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

१. साधकांनी स्वतःचे स्वभावदोष घालवून स्वतःला सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणे; मात्र सामान्य जिवाने स्वतःचे स्वभावदोष लपवून स्वतःची हानी करून घेणे : ‘रामनाथी आश्रमात आल्यानंतर ‘साधक त्यांचे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची सूची (पाटी) लिहून ती गळ्यात घालतात’, असे मला दिसले. साधक त्यांचे स्वभावदोष घालवून स्वतःला सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण करून ईश्‍वराच्या जवळ जातात; मात्र सामान्य जीव स्वतःच्या स्वभावदोषांचे ओझे स्वतःच्याच पाठीवर घेऊन ते ईश्‍वरापासून लपवण्याचा प्रयत्न करून स्वतःची अधोगती करून घेतात.

२. ‘आश्रमातील लाद्यांवरून चालतांना पाण्यावरून चालत आहे’, असे वाटत होते.’

– श्री. संभाजी चव्हाण, बेळगाव (५.९.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now