पोप फ्रान्सिस यांनी दक्षिण सुदानच्या नेत्यांच्या पायांचे चुंबन घेतले

शांतता राखून ऐक्य टिकवण्याचे आवाहन

  • ख्रिस्त्यांच्या सर्वोच्च धर्मगुरूंवर ओढवलेली नामुष्की ! सुदान हा ख्रिस्तीबहुल देश आहे. प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या ख्रिस्ती धर्माचे हे अपयश म्हणावे लागेल !
  • अशामुळे शांतता टिकवून ठेवता आली असती, तर सर्व जगच शांततेत राहिले असते !

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी शांतीची मागणी करत आफ्रिकेतील दक्षिण सुदान देशाच्या नेत्याच्या पायांचे चुंबन घेतले. या घटनेचा ‘व्हिडिओ’ सध्या सर्वत्र प्रसारित झाला आहे.

१. ११ एप्रिल या दिवशी व्हॅटिकनमध्ये आफ्रिकी नेत्यांची एक आध्यात्मिक बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी दक्षिण सुदानचे अध्यक्ष साल्वा कीर आणि देशाच्या ५ उपराष्ट्रपतींपैकी ४ उपस्थित होते. या वेळी वर्ष २०१८ मध्ये झालेल्या शांती कराराची आठवण करून देत, शांती टिकून रहावी, यासाठी पोप फ्रान्सिस यांनी गुडघ्यावर बसून सर्व नेत्यांच्या पायांचे चुंबन घेतले.

२. पोप म्हणाले की, मी माझ्या हृदयापासून तुम्हाला सांगत आहे, शांततेत रहा. तुमच्यामध्ये कदाचित् भांडणे असतील; पण ती या कार्यालयामध्ये राहू द्या. नेत्यांनी आणि इतर दक्षिण सुदानी अधिकार्‍यांनी देशात ऐक्य टिकवून ठेवावे. जनतेसमोर एकमेकांच्या समवेत रहा, देशाचे जनक व्हा.’

३. वर्ष २०११ मध्ये दक्षिण सुदानने सुदानपासून स्वातंत्र्य मिळवले. यासाठी मोठे युद्ध करावे लागले. ५ वर्षांच्या गृहयुद्धामुळे बर्‍याच लोकांनी त्यांचे प्राण गमावले, अनेक जण बेघर झाले, तर कित्येक जण भुकेने मरण पावले. आता या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी पोप फ्रान्सिस प्रयत्न करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF